१९५ गावांसह ५७२ आदिवासी पाड्यांत पाणी समस्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2019 11:52 PM2019-01-27T23:52:42+5:302019-01-27T23:53:15+5:30

ठाणे जिल्ह्याची परिस्थिती; उपाययोजनेसाठी साडेसात कोटींचा खर्च; विहिरी खोल करणार, नवीन विंधण विहिरी खोदणार

572 tribal paddy water problems with 95 villages | १९५ गावांसह ५७२ आदिवासी पाड्यांत पाणी समस्या

१९५ गावांसह ५७२ आदिवासी पाड्यांत पाणी समस्या

Next

- सुरेश लोखंडे 

ठाणे : जिल्ह्यातील १९५ गावे आणि ५७२ आदिवासी, दुर्गम भागातील पाड्यांंमध्ये तीव्र पाणीटंचाई उद्भवण्याची शक्यता आहे. त्यावर उपाययोजना म्हणून ठाणे जिल्हा परिषदेने युध्दपातळीवर हालचाली करून सात कोटी ४२ लाख रूपये खर्चाचे नियोजन केले आहे. या निधीतून विहिरी खोल करण्यासह टँकर - बैलगाडीने पाणी पुरवठा, नळपाणी पुरवठ्याची दुरूस्ती, पुरक योजना, नवीन विंधन विहिरी तयार करणे आदी कामे हाती घेण्याचे नियोजन आहे.

‘ग्रामीण भागात टंचाईच्या झळा तीव्र’, या मथळ्याखाली लोकमतने ८ जानेवारी रोजी वृत्त प्रसिध्द करून जिल्हा परिषदेचे लक्ष वेधले. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने त्वरित हालचाली करून सात कोटी ४२ लाखांच्या खर्चाचे नियोजन केले. या निधीतून पाणी टंचाईवर मात केली जाईल. महापालिकांसह औद्योगिक क्षेत्राच्या पाणी कपातीपेक्षाही जिल्ह्णातील ग्रामीण, आदिवासी आणि दुर्गम भागात पाणी टंचाईच्या झळा तीव्र आहेत.

शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या ग्रामीण, दुर्गम भागात धरणांचे जाळे पसरले आहे. मात्र त्यापासून जवळच्या गावखेड्यांना सर्वच पातळीवरील लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीमुळे वर्षानुवर्षे पाणी टंचाई सोसावी लागते आहे. दरवर्षी कोट्यवधी खर्च होऊनही उन्हाळ्यात पाणी समस्या उद्भवते. प्रशासनाच्या निष्काळजीमुळे भ्रष्टाचाराच्या चक्रव्युहातील पाणी पुरवठा योजना सुरू झाल्या नाही. या अर्धवट योजनांच्या गावातील पाणी टंचाईवरील उपाययोजनेसाठी साधी बोरवेलही घेता येत नसल्याची खंतही लोाकप्रतिनिधींकडून व्यक्त होत आहे. गेल्या वर्षी १२१ मोठे गावे आणि ३२७ पाड्यांनी पाणी समस्येला तोंड दिले. यंदा ही १९५ गावे आणि ५७२ पाडे पाणी टंचाईच्या चक्रव्युहात अडकले आहेत.

टंचाई भेडसावणाºया गांवपाड्यांपैकी ८८ गावे अािण २३० पाड्यांना एक कोटी ३५ लाख रूपये खर्चून टँकर किंवा बैलगाडीने यंदा पाणी पुरवठा होईल. जेथे वाहन जाणे शक्य नाही, तेथे बैलगाडीने पाणी पुरवठा होईल. या नियोजनात शहापूर तालुक्यातील सर्वाधिक ६५ गावे, १८३ पाड्यांचा समावेश आहे. त्यांच्यासाठी एक कोटी पाच लाखांच्या खर्चाची तरतूद झाली आहे. या खालोखाल मुरबाड तालुक्यात १८ गावे व ३३ पाड्यांना टँकर किंवा बैलगाडीने पाणी पुरवठा होईल. त्यावर २१ लाख ७६ हजार रूपये खर्च होतील. यानंतर भिवंडीला तीन गावे सहा पाडे आणि अंबरनाथला दोन गावे आठ पाड्यांना टँकर, बैलगाडीने पाणी पुरवठा होईल.

योजनांची दुरूस्ती- नवीन बोरवेल
विहिरी खोल करण्यासाठी १८लाखांची तरतूद केली आहे. यातून शहापूरच्या ३० गावांसह ६३ पाड्यांच्या विहिरी खोल होतील. नळपाणी पुरवठा योजनांच्या विशेष दुरूस्तीसाठी दोन कोटी २२ लाखांची तरतूद आहे. यातून शहापूरचे सहा गावे, सहा पाड्यांसाठीह एक कोटी ५४ लाखांच्या खर्चा नियोजन आहे.

मुरबाडमधील पाच गावे आणि एक पाड्यासाठी ५८ लाखांचा खर्च होणार आहे. चार गावे आणि दोन पाड्यांना पुरक पाणी पुरवठा योजना होईल. त्यासाठी एक कोटी ६८ लाखांचे नियोजन केले. नवीन विंधन विहिरीसाठी एक कोटी ९८ लाखांचा खर्च निश्चित केला.
त्यातून ६२ गावे आणि २३९ पाड्यांना विंधन विहिरी (बोरवेल) तयार होणार आहे. यापैकी सर्वाधिक मुरबाड तालुक्यामधील २० गावे ४४ पाड्यांना ३८ लाख ४० हजारांचे नियोजन असून, शहापूरच्या १८ गावांसह ५० पाड्यांवर ४० लाख ८० हजार रूपये खर्च होईल.

टंचाईग्रस्त गावे, पाड्यांवरील खर्चाचे नियोजन
तालुका        गावे      पाडे        निधीची तरतूद
अंबरनाथ      १२        ४४            ४१ लाख
कल्याण        १०        ३६         १ कोटी १६ लाख
भिवंडी         ०९        ११०        ६९ लाख ८४ हजार
मुरबाड        ४३         ७९         १ कोटी ३३ लाख
शहापूर       १२१       ३०३         ३ कोटी ८२ लाख

Web Title: 572 tribal paddy water problems with 95 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.