५८ जणांना ८ कोटींहून अधिक रुपयांना गंडा
By admin | Published: October 23, 2016 01:59 AM2016-10-23T01:59:08+5:302016-10-23T01:59:08+5:30
फ्लॅट बुकिंगचे पैसे घेताना दिलेल्या अॅग्रीमेंटप्रमाणे इमारतीचे बांधकाम पूर्ण न करता तसेच फ्लॅटचा ताबा वेळेत न देता ५८ जणांची ८ कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक करणाऱ्या
ठाणे : फ्लॅट बुकिंगचे पैसे घेताना दिलेल्या अॅग्रीमेंटप्रमाणे इमारतीचे बांधकाम पूर्ण न करता तसेच फ्लॅटचा ताबा वेळेत न देता ५८ जणांची ८ कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अद्यापही कोणाला अटक के ली नसल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली.
त्बुकिंग करताना अॅग्रीमेंट व अॅलॉटमेंट लेटरप्रमाणे मुदतीत इमारतीचे बांधकाम यांनी पूर्ण केले नाही. तसेच फ्लॅटचा ताबा न देता पैशांचा अपहार केल्याचा आरोप ५८ जणांनी केला आहे. ही फसवणूक मेसर्स एम.एस. शाह डेव्हलपर्स प्रा.लि. या बांधकाम फर्मचे पार्टनर मोहम्मद सलीम मापखान शाह आणि अब्दुल हमीद मापखान शाह यांनी केल्याची तक्रार आहे. (प्रतिनिधी)