ठाण्यात ५.८४ मिमी पाऊस, शहरात ढगांच्या गडगडाटात पावसाची हजेरी
By अजित मांडके | Published: November 9, 2023 10:59 PM2023-11-09T22:59:55+5:302023-11-09T23:00:32+5:30
गुरुवारी रात्री पावसाचे वातावरण निर्माण झाले होते. सुरुवातीला जोराचा वारा सुरू झाला
ठाणे - हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवला असताना, दिवाळीच्या तोंडावर ठाणे शहरात गुरुवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास अचानक ढगांच्या गडगडाटात पावसाळा सुरुवात झाल्याने दिवाळी खरेदीसाठी गेलेल्या ठाणेकर नागरिकांची चांगली तारांबळ उडाली. एक तासात ५.८४ मिमी पावसाची नोंद झाली.
गुरुवारी रात्री पावसाचे वातावरण निर्माण झाले होते. सुरुवातीला जोराचा वारा सुरू झाला. त्याच वाऱ्याने वातावरणात गारवा निर्माण झाला. त्यानंतर अचानक गडगडाट होऊन पावसाळा सुरुवात झाली. त्यामुळे मार्केटमध्ये दिवाळीच्या खरेदी गेलेल्या ठाणेकर नागरिकांची चांगली धावपळ सह तारांबळ उडाल्याचे पाहण्यास मिळाले. दिवाळीच्या तोंडावर पडणारा पाऊस हा पावसाळ्यासारखा पडताना दिसत होता.
ठाण्यात अवकाळी पाऊस, अचानक आलेल्या पावसाने नागरिकांचा तारांबळ(Video - विशाल हळदे) #Thanepic.twitter.com/1Bq0cWWM5e
— Lokmat (@lokmat) November 9, 2023