ठाणे जिल्ह्यात ५९२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; ३८ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 09:31 PM2021-06-04T21:31:42+5:302021-06-04T21:32:09+5:30
ठाणे शहरात नवे १२३ कोरोनाबाधित
ठाणे : जिल्ह्यात कोरोनाचे ५९२ रुग्ण शुक्रवारी आढळले आहे. गेल्या २४ तासात ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पाच लाख २० हजार ३३२ बाधित व एकूण नऊ हजार ४०८ मृतांची नोंद केली आहे. ठाणे शहरात १२६ रुग्णांची वाढ होऊन चार जणांचा मृत्यू झाला. यासह शहरात एक लाख ३० हजार ७३३ रुग्णांची व एक हजार ९१५ मृतांची नोंद झाली. कल्याण डोंबिवलीत १३९ रुग्ण सापडले असून २२ मृत्यू झाले आहेत. येथील एकूण एक लाख ३३ हजार ६४६ बाधितांसह दोन हजार ९३ मृतांची नोंद केली आहे.
उल्हासनगरमध्ये ४५ रुग्ण आढळले असून एकही मृत्यू झाला नाही. या शहरात एकूण २० हजार ५६५ रुग्णांची व ४७५ मृत्यू नोंदले आहे. भिवंडीत आठ रुग्ण सापडले असून एकाचा मृत्यू झाला आहे. येथील रुग्णांची संख्या १० हजार ४९० व ४४४ मृत्यू आजपर्यंत नोंदवले आहेत. मीरा भाईंदरमध्ये दिवसभरात ७९ बाधितांसह दोन मृत्यू झाल्याचे उघड झाले. या शहरात आजपर्यंत ४९ हजार २६० बाधित व एक हजार २८६ मृतांची नोंद झाली आहे.
अंबरनाथमध्ये १२ बाधित आज सापडले असून एकही मृत्यू नाही. येथील एकूण रुग्ण संख्या १९ हजार ३९८ बाधीत व ४०९ मृत्यू झाले आहेत. कुळगांव बदलापूरला २६ रुग्णांची वाढ होऊन एकही मृत्यू नाही. या शहरातील २० हजार ६७४ बाधितांची व २५४ मृतांची नोंद आजपर्यंत झाली. ग्रामीण गांवपाड्यांत ७० रुग्णांसह दोन मृत्यू झाल्याचे आढळून आले. या परिसरातील बाधितांची संख्या ३७ हजार २२३ व ९०४ मृत्यू नोंदले गेले आहेत.