क्रीडा महाकुंभ मध्ये गणेश आखाड्याच्या ६ पैलवानांनी मारली बाजी
By धीरज परब | Published: February 14, 2024 07:46 PM2024-02-14T19:46:57+5:302024-02-14T19:47:44+5:30
भाईंदरच्या गणेश आखाडा च्या ६ पैलवानांनी बाजी मारली .
लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - अंधेरीच्या छत्रपती संभाजी महाराज नगर क्रीडांगण येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ मधील कुस्ती स्पर्धेत भाईंदरच्या गणेश आखाडा च्या ६ पैलवानांनी बाजी मारली .
२० फेब्रुवारी पर्यंत चालणाऱ्या क्रीडा महाकुंभ मध्ये ११ ते १३ फेब्रुवारी २०२४ दरम्यान संपन्न झालेल्या ह्या कुस्ती स्पर्धेत मीरा भाईंदर महानगर पालिकेच्या सौजन्याने व मीरा भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाडा च्या पैलवानांनी ३ सुवर्ण , २ रौप्य व १ कांस्य पदकाची कमाई केली .
१७ वर्षा आतील गटात ४० किलो वजनी मध्ये पै. कविता राजभर हिने सुवर्ण पदक पटकावले . तर कोमल पटेल हिने ४६ किलो वजनी गटात अंतिम सामन्यात स्थान मिळवले आहे . २० फेब्रुवारी रोजी कुस्ती मैदानात सदर कुस्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लावण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले . १८ वर्षा वरील मुली मध्ये मनीषा शेलार हिने ५० किलो वजनी गटात सुवर्ण तर डॉली गुप्ता हिने ५५ किलो वजनी गटात सुवर्ण पदक मिळवले .
१८ वर्षा वरील मुलां मध्ये दीपक सरोज याने ६१ किलो वजनी गटात रौप्य ; लकी अडबल्ले याने ६१ किलो वजनी गटात कांस्य तर पैलवान प्रवीण वाकडे याने ६५ किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावले आहे . विजेत्या सर्व पैलवानांचे अभिनंदन केले जात असून आखाड्याचे संस्थापक व वस्ताद वसंतराव पाटील , कुस्ती प्रशिक्षक वैभव माने व कोमल देसाई यांचे मार्गदर्शन लाभले.