नालासोपार्यात उघड्या गटारात पडून ६ वर्षीय बालकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2019 09:22 PM2019-09-05T21:22:23+5:302019-09-05T21:26:57+5:30
या घटनेमुळे आई -वडिलांना मोठा धक्का बसला असून परिसरात एकच खळबळ माजली होती.
नालासोपारा - नालासोपारा परिसरात उघड्या गटारात पडून एका ६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. कालपासून मुंबईसह वसई विरारमध्ये मुसळधार पाऊस पडत होता. तेव्हा पाण्याचा निचरा होण्यासाठी गटाराची झाकणे उघडण्यात आली होती. या उघडलेल्या गटारात पडून ६ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे आई -वडिलांना मोठा धक्का बसला असून परिसरात एकच खळबळ माजली होती.
काल दुपारपासून मुंबईसह ठाणे, वसई - विरार येथे मुसळधार पडत होता. अनेक ठिकाणी भागात पाणी साचले होते. नालासोपार्यातही मुसळधार पावसामुळे पाणी साचले होते. त्यामुळे पाणी जाण्यासाठी काही ठिकाणी गटाराची झाकणं खुली ठेवण्यात आली होती. त्यावेळी एका उघड्या गटरात हा ६ वर्षाचा मुलगा वाहून गेला. रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध सुरू होता. मात्र, तो सापडला नाही. आज सकाळी त्याचा मृतदेह हाती लागला.
Maharashtra: A 6-year-old boy died after he fell into a gutter last evening, in Nala Sopara area of Palghar district. His body was recovered late last night.
— ANI (@ANI) September 5, 2019