लसींच्या २५० मात्रांसाठी ६०० जण रांगेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:43 AM2021-08-22T04:43:15+5:302021-08-22T04:43:15+5:30
मुंब्रा : रुग्णालयांमध्ये देण्यात येणा-या लसींच्या मात्रांपेक्षा कैकपटीने अधिक जण लसींसाठी रांगेत उभे असल्याचे दृश्य शनिवारी मुंब्य्रात दिसले. सरकारने ...
मुंब्रा : रुग्णालयांमध्ये देण्यात येणा-या लसींच्या मात्रांपेक्षा कैकपटीने अधिक जण लसींसाठी रांगेत उभे असल्याचे दृश्य शनिवारी मुंब्य्रात दिसले. सरकारने दोन मात्रांनंतर १४ दिवसांनी लोकलमधून प्रवास करण्याची मुभा १५ ऑगस्टपासून दिली आहे. यामुळे पूर्वी लस घेण्याकडे दुर्लक्ष करणा-या बहुतांश नागरिकांचा कल आता लस घेण्याकडे वाढू लागला आहे. यामुळे तसेच काही दिवसांच्या अंतराने केंद्रांमध्ये येत असलेल्या लसींमुळे तसेच अल्प प्रमाणातील मात्रांच्या तुलनेत ती घेणा-यांची संख्या कैकपटीने अधिक असल्याने लसीकरण केंद्रांंबाहेरील रांगा वाढत आहेत. काही जण तर मध्यरात्री चार वाजल्यापासून रांगेत उभे राहत असल्याची माहिती रांगेत उभ्या असणा-या अनेकांनी लोकमतला दिली.