भिवंडीत १६ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ६०३ उमेदवारी अर्ज दाखल

By नितीन पंडित | Published: October 21, 2023 03:01 PM2023-10-21T15:01:56+5:302023-10-21T15:02:12+5:30

दोन ग्रामपंचायती बिनविरोध.

603 nominations filed for 16 Gram Panchayat elections in Bhiwandi | भिवंडीत १६ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ६०३ उमेदवारी अर्ज दाखल

भिवंडीत १६ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ६०३ उमेदवारी अर्ज दाखल

नितीन पंडित

भिवंडी:  तालुक्यातील १६ ग्राम पंचायतींच्या निवडणुकांसाठी एकूण ६०३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये थेट सरपंच पदा करिता ७२ जणांचा तसेच पोटनिवडणुका होत असलेल्या ९ सदस्य पदां साठीच्या उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यांचा समावेश आहे.

तालुक्यातील भिवंडी तालुक्यातील राहनाळ,कालवार,काटई,खोणी या मोठ्या ग्रामपंचायतींसह भोकरी,गोवे,पायगाव,दिवे केवणी,वडुनवघर,मोरणी,कुसापूर, व अनुसूचित क्षेत्रात समाविष्ट असणाऱ्या महाळुंगे,वज्रेश्वरी, नांदिठणे,पहारे,चिंचवली तर्फे कुंदे अशा १६ ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्य अशा एकूण १७५ तर दापोडे,खांडवळ,तळवली अर्जुनली, एकसाल या ग्रामपंचायती मधील ९ सदस्य पदांसाठी निवडणुका होत आहेत.उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत १८४  सदस्य पदांसाठी ५३१ तर १६ सरपंच पदां करीता ७२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. 

यापैकी महाळुंगे व मोरणी या पुनर्वसन वसाहत असलेल्या गावामध्ये सरपंच व सदस्य पदांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत.तर दापोडे ग्रामपंचायतींच्या ५ सदस्य बिनविरोध निवडले गेल्याने आता १६३ सदस्य पदांकरिता ५८०  व १४ सरपंच पदांसाठी ७२ उमेदवार निवडणुकी च्या रिंगणात उतरले आहेत.२३ ऑक्टोंबर रोजी उमेदवारी अर्ज छाननी व २५ ऑक्टोंबर पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रीये नंतर खरी लढत स्पष्ट होणार आहे.

Web Title: 603 nominations filed for 16 Gram Panchayat elections in Bhiwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.