टिटवाळा शहराजवळच्या 61 गावांत अंधाराचे साम्राज्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2019 08:06 PM2019-08-04T20:06:18+5:302019-08-04T20:15:49+5:30

हजारो रेल्वे प्रवासी अडकले

In the 61st villages of the city of Titwala having no electricity | टिटवाळा शहराजवळच्या 61 गावांत अंधाराचे साम्राज्य

टिटवाळा शहराजवळच्या 61 गावांत अंधाराचे साम्राज्य

Next

उमेश जाधव, टिटवाळा-:मध्य रेल्वेच्या रेल्वे ट्रॅक मध्ये पाणी साचल्यामुळे खडवली स्थानकात अमरावती-मुंबई  एक्सप्रेस पहाटे चार वाजल्यापासून थांबविण्यात आली आहे. या लांब पल्ल्याच्या गाडीमध्ये असा प्रवास अडकून पडले आहेत. तसेच मुंबईहून कासार च्या दिशेने जाणारी लोकल ट्रेन देखील या स्थानकात थांबविण्यात आली आहे. ह्या लोकल ट्रेनमध्ये देखील शेकडो प्रवासी अडकले आहेत. या सर्व प्रवाशांना येथील प्रगती मित्र मंडळाचे अध्यक्ष वकील व ठाणे जिल्हा युवा सेनेचे अध्यक्ष आल्पेश भोइर व त्यांचे सहकारी तसेच एकता मित्र मंडळचे रवी गायकर व त्यांचे सहकारी यांनी सकाळपासून पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढणे व त्यांना चहा, नास्ता पाणी व  जेवणाची व्यवस्था केली आहे.  तसेच या  दोन्ही रेल्वेच्या गाड्यांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना देखील चहा, पाणी नाश्ता व जेवणाची व्यवस्था केली आहे. रात्री देखील या सर्व लोकांना जेवणाची व्यवस्था करण्यास सुरुवात केली आहे.

आज विद्युत पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता धूसर... 

दोन दिवसा पासून पडलेल्या तुफान पावसामुळे पाण्याची पातळी वाढल्याने महावितरणच्या अनेक एसटी व एलटी विद्युत वाहीन्या  पाण्याखाली गेल्याने तसेच मांडा टिटवाळा व ग्रामीण भागातील पुराच्या पाण्याची पातळी काही केल्या कमी होत नाही. तसेच रायते येथून मोहने फिडरकडे जाणाऱ्या मुख्य एसटी लाईनचा पोल (खांब)  झुकल्यामुळे तिथे पावसाच्या पाण्यामुळे विधुत कर्मचाऱ्यांना काम करण्यासाठी पोहचता येत नाही.  या कारणास्तव रवीवारी रात्रभर तरी विद्युत पुरवठा खंडित राहू शकतो.  अशी माहिती महावितरणचे टिटवाळा शाखेचे कनिष्ठ अभियंता निलेश महाजन यांनी दिली. सदरच्या परीसरातील पाण्याची पातळी काही अंशी कमी झाल्यास विधुत पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जाईल अशी शक्यता ही त्यांनी वर्तवली असून याची नागरिकांनी दखल घ्यावी असे आवाहन त्यांनी नागरिक व विज ग्राहकांना केले आहे

Web Title: In the 61st villages of the city of Titwala having no electricity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.