ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ६२५ रुग्ण सापडले; ५ रुग्ण दगावले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2021 08:39 PM2021-02-27T20:39:51+5:302021-02-27T20:40:16+5:30
ठाणे जिल्ह्यात आता २ लाख ६४ हजार २५० रुग्णांची नोंद झाली. दिवसभरात ५ रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची संख्या ६ हजार २६८ झाली आहे.
ठाणे : जिल्ह्यात शानिवारी कोरोनाचे ६२५ रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात आता २ लाख ६४ हजार २५० रुग्णांची नोंद झाली. दिवसभरात ५ रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची संख्या ६ हजार २६८ झाली आहे.
ठाणे शहर परिसरात १९९ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता ६२ हजार १२९ झाली आहे. शहरात १ जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून मृत्यूची संख्या १ हजार ३८५ झाली आहे. नवी मुंबई मधे १०१ रुग्ण आढळले असून एकाचा मुर्तु जाला आहे. कल्याण - डोंबिवलीत १८७ रुग्णांची वाढ झाली असून दोघनचा मृत्यू झाला आहे. उल्हासनगरमध्ये १६ रुग्ण सापडले असून एकही मृत्यू झाला नाही. भिवंडीत ५ बाधीत असून एकही मृत्यूची नोंद नाही. मीरा भाईंदरमध्ये ५१ रुग्ण आढळले असून एका मृत्यूची नोंद आहे. अंबरनाथमध्ये १३ रुग्ण आढळले असून एकही मृत्यू नाही. बदलापूरमध्ये ३५ रुग्णांची नोंद झाली असून मृत्यूची नोंद आहे. ठाणे ग्रामीणमध्ये १८ रुग्णांची वाढ झाली असून एकाचा मृत्यू जाला आहे. आता बाधीत १९ हजार ५२७ आणि आतापर्यंत ५९३ मृत्यू आहेत.