ठाणे जिल्हा परिषदेचे पालघरमध्ये अडकलेले ६३ आराेग्य कर्मचारी ठाण्यात परतले!

By सुरेश लोखंडे | Published: July 25, 2023 05:00 PM2023-07-25T17:00:47+5:302023-07-25T17:01:13+5:30

विभाजन हाेऊन उदयाला आलेल्या पालघर या आदिवासी जिल्ह्यातील कामकाज सुरळीत सुरू ठेवण्यासाठी ठाणे जिल्हा परीषदेचे कर्मचारी तेथे सक्रीय ठेवलेले आहे

63 health workers of Thane Zilla Parishad stuck in Palghar returned to Thane! | ठाणे जिल्हा परिषदेचे पालघरमध्ये अडकलेले ६३ आराेग्य कर्मचारी ठाण्यात परतले!

ठाणे जिल्हा परिषदेचे पालघरमध्ये अडकलेले ६३ आराेग्य कर्मचारी ठाण्यात परतले!

googlenewsNext

ठाणे : जिल्ह्याचे विभाजन हाेऊन पालघर जिल्ह्याची निमिर्ती झाली आहे. तेव्हापासून पालघरमध्ये ठाणे जिल्हा परिषदेच्या आराेग्य विभागाचे ७८ कर्मचारी अडकवून ठेवलेले आहेत. त्यापैकी आता ७१ कर्मचाऱ्यांच्या बदलीचे आदेश झाले आहेत. या कर्मचाऱ्यांपैकी ६३ कर्मचारी हजर झाल्याची माहिती ठाणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी लाेकमतला सांगितले.

विभाजन हाेऊन उदयाला आलेल्या पालघर या आदिवासी जिल्ह्यातील कामकाज सुरळीत सुरू ठेवण्यासाठी ठाणे जिल्हा परीषदेचे कर्मचारी तेथे सक्रीय ठेवलेले आहे. त्यापैकी ज्या कर्मचार्यांना ठाणे जिल्ह्यात यायचे आहे, अशांचा सहमतीदर्शक विकल्प त्याच वेळी जिल्हा परिषदेने लिहून घेतला हाेता. आता पालघर जिल्हा परिषदेसाठी कर्मचार्यांची रितसर भरती करून रिक्त जागा भरल्या जात आहे. त्यानुसार विकल्प घेतलेले कर्मचार्यांचा बदल्या ठाणे जिल्हा परिषदेत केल्या जात आहे. आराेग्य विभागाच्या या ७८ पैकी ७१ कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यापैकी ६३ कर्मचारी ठाणे जिल्हा परिषदेच्या कामकाजात सक्रीयही झाले. उर्वरित साज कर्मचारी पालघरमध्ये आहेत.

पालघरमधून ठाणे जिल्ह्यात आलेल्या या कर्मचार्यांमध्ये सर्वाधिक ३२ आराेग्य सेवक असून त्यापैकी ३१ हजर झाले. तर २१ महिला आराेग्य सेविकांपैकी १९ हजर झाले आहेत. याशिवाय बदली झालेल्या नऊ औषध निर्माण् अधिकार्यांपैकी सहा जण हजर झाले आहेत. तर पाच प्रयाेग शाळा तंत्रज्ञांपैकी चार कामावर सक्रीय झाले. चार शिफाई कामगारांपैकी तीन कामगार हजर हाेऊन कामाला लागले आहेत. त्यामुळे आतापर्यंत कमी कर्मचार्यांमध्ये गांवखेड्यांची काळजी घेणार्या आराेग्य विभागाला आता अधीकचे मनुष्यबळ मिळाले आहे.

Web Title: 63 health workers of Thane Zilla Parishad stuck in Palghar returned to Thane!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे