ठाण्यात ६५ शाळा अनधिकृत

By admin | Published: March 14, 2016 01:49 AM2016-03-14T01:49:21+5:302016-03-14T01:49:21+5:30

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील उच्चभ्रूंच्या मुलांची पसंती असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांसह हिंदी, उर्दू आणि मराठी माध्यमाच्या ६५ शाळा अनधिकृत असल्याचे ठाणे मनपाच्या शिक्षण विभागाने जाहीर

65 schools unauthorized in Thane | ठाण्यात ६५ शाळा अनधिकृत

ठाण्यात ६५ शाळा अनधिकृत

Next

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील उच्चभ्रूंच्या मुलांची पसंती असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांसह हिंदी, उर्दू आणि मराठी माध्यमाच्या ६५ शाळा अनधिकृत असल्याचे ठाणे मनपाच्या शिक्षण विभागाने जाहीर केले आहे. या शाळांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्यांकरिता प्रवेश घेऊ नका, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
शासनाची मान्यता नसतानाही अल्पावधीत जादा पैसे कमविण्यासाठी वारेमाप शैक्षणिक शुल्क घेणाऱ्या या शाळा महापालिकेने अनधिकृत म्हणून घोषित केल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक इंग्रजी माध्यमाच्या ५३ शाळा असून मराठी माध्यमाच्या सहा, हिंदी माध्यमाच्या चार, उर्दूच्या दोन अशा ६५ शाळांचा समावेश आहे.
शहरात दीर्घ काळापासून सुरू असलेल्या या शाळांना अद्यापही शासनाची मान्यता नाही. यामुळे या अनधिकृत शाळांमध्ये पाल्यांचे प्रवेश घेण्यास महापालिकेने मनाई केली आहे. या शाळा कायमच्या बंद करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे.
तत्पूर्वी या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश घेऊ नये, प्रवेश घेऊन होणाऱ्या संभाव्य शैक्षणिक नुकसानीला महापालिका जबाबदार राहणार नसल्याचे शिक्षण विभागाकडून सांगितले जात आहे.
अनधिकृत शाळांची यादी
शहरातील राबोडी, टेंभीनाका, घोलाईदेवीजवळ, कळवा, टाकोळी, दिवा, मुंब्रा, घोडबंदर, मानपाडा, बोरीवाडा, मनोरमानगर, दिवा-शीळ रोड, आदी परिसरातील या शाळांचा समावेश आहे.
दिवा परिसरात अनधिकृत शाळांचे पेव फुटले आहे. यामध्ये ए.एच. पब्लिक स्कूल- राबोडी, विजय वल्लभ विद्यालय- टेंभीनाका, मदर मेरी- कळवा, मदर एच.एस.- कळवा, ग्लॉसम इंग्लिश स्कूल- कळवा, श्रीमती मालतीदेवी अंबिकानगर- रेन्बो दिवा, चौहान विद्यामंदिर- दिवा, एस.टी. गुरुकुल- दिवा, एन्जल पॅराडाइज इंग्लिश स्कूल- दिवा, दी के.सी.टी. स्कूल- दिवा, न्यू इंग्लिश स्कूल, बी.आर. रोड, न्यू होली स्पिरीट हायस्कूल- दिवा, न्यू गुरुकुल कॉन्व्हेंट हायस्कूल- दिवा, आर.एल.पी. हायस्कूल- दिवा, आर.एस.व्ही. हायस्कूल- मुंब्रा दिवा, कॉलनी, आर.एन. विद्यालय- दिवा, आर.जे.पी. इंग्लिश स्कूल- दिवा, फाउंडेशन स्कूल- मुंब्रा, आदर्श विद्यालय- दिवा, आदर्श गुरुकुल- दिवा, आर्या पब्लिक स्कूल- दिवा, आर्यन विद्यालय- दिवा, ओम साई इंग्लिश स्कूल- गणेशनगर, बेडेकर इंग्लिश स्कूल- दिवा, भारत इंग्लिश स्कूल- दिवा, होली मारिया- दातिवली, सेंट फ्रान्सिस हायस्कूल- दिवा, श्री विद्या ज्योती- दिवा, श्री दत्तात्रेय कृपा हायस्कूल- दिवा, स्टार इंग्लिश हायस्कूल- दिवा, गुरुकुल इंग्रजी स्कूल- दिवा, गणपत एस.जी. वारेकर इंग्लिश स्कूल- दिवा, नालंदा हिंदी हायस्कूल- दिवा, बुरहानी स्मार्ट चॅम्प्स इंग्लिश हायस्कूल- मुंब्रा, युरो स्कूल- घोडबंदर रोड, होली ट्रिनेटी इंग्लिश प्राथमिक स्कूल- मानपाडा, नवोदया इंग्रजी स्कूल- मानपाडा, रेन्बो इंग्लिश स्कूल दिवा-शीळ, रफिका उर्दू प्राथमिक शीळफाटा, रयान इंग्लिश स्कूल- मुंब्रा, शादान इंग्लिश स्कूल- कौसा, एम.एस. क्रिएटिव्ह इंग्लिश स्कूल- कौसा, फादर एंजल्स कॉन्व्हेंट स्कूल -मुंब्रा, लिटिल एंजल्स इंग्लिश स्कूल- कौसा, न्यू मॉडेल स्कूल- कौसा, अरकम इस्लामिक स्कूल- कौसा.

Web Title: 65 schools unauthorized in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.