भाजपा-सेनेच्या दोघा नगरसेवकांसह एकूण ६८ जणांवर गुन्हा दाखल, महापालिकासुद्धा आरोपीच्या पिंज-यात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2018 08:18 PM2018-03-06T20:18:07+5:302018-03-06T20:18:07+5:30

उच्च न्यायालयाच्या दट्यानंतर अखेर पेणकरपाडा येथे सरकारी खाजणमध्ये अतिक्रमण करून बेकायदा बांधकामे केल्याप्रकरणी मंडळ अधिका-यांनी स्थानिक भाजपा व शिवसेनेचे दोन नगरसेवक, मीरा-भार्इंदर महापालिकेसह एकूण ६८ जणांवर काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय.

68 people, including two corporators of BJP-Sena, filed a complaint against the accused | भाजपा-सेनेच्या दोघा नगरसेवकांसह एकूण ६८ जणांवर गुन्हा दाखल, महापालिकासुद्धा आरोपीच्या पिंज-यात

भाजपा-सेनेच्या दोघा नगरसेवकांसह एकूण ६८ जणांवर गुन्हा दाखल, महापालिकासुद्धा आरोपीच्या पिंज-यात

Next

मीरा रोड - उच्च न्यायालयाच्या दट्यानंतर अखेर पेणकरपाडा येथे सरकारी खाजणमध्ये अतिक्रमण करून बेकायदा बांधकामे केल्याप्रकरणी मंडळ अधिका-यांनी स्थानिक भाजपा व शिवसेनेचे दोन नगरसेवक, मीरा-भार्इंदर महापालिकेसह एकूण ६८ जणांवर काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने २२ फेब्रुवारी रोजी राजकिय नेते देव नाहीत व कायद्यापेक्षा कोणी श्रेष्ठ नाहीत नसल्याचे ठणकावत महापालिका व पोलिसांना फटकारले होते. कारवाई करण्यास घाबरता का ? असा सवाल देखील केला होता.

पेणकरपाडा मधील सर्वे क्र. नवीन १/१ हा सरकारी खाजण आहे. हा परिसर पाणथळ, कांदळवन व सीआरझेड बाधित आहे. सरकारी जागा असताना देखील महापालिका, स्थानिक नगरसेवक व महसूल विभागाच्या आशीर्वादाने येथील पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात -हास करून सर्रास अनधिकृत बांधकामे झाली आहेत. या बांधकामांना महापालिकेने पाणी, गटार, पदपथ, दिवाबत्ती आदी सुविधा पुरवतानाच कर आकारणी केली. तर वीज कंपन्यांनी वीज पुरवठा केलाय. या अनधिकृत बांधकामांविरोधात भारत मोकल या स्थानिक कार्यकर्त्याने सातत्याने तक्रारी करून देखील पालिका, महसूल विभाग थातूरमातूर कारवाई करत. पालिका तर सरकारी जागा असल्याचे सांगून अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यास एकीकडे हातवर करताना दुसरीकडे कर आकारणीपासून सर्व सुविधा मात्र देत आली आहे.

मिरे गावचे तलाठी यांनी येथील अतिक्रमणाबाबत जुलै २०१४ व मार्च २०१६ मध्ये अहवाल दिला होता. उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर मात्र तहसीलदार अधिक पाटील यांनी २८ फेब्रुवारी रोजी शसकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याप्रकरणी महसूल अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते.

त्या अनुषंगाने तलाठी यांनी ३ मार्च रोजी पंचनामा केला होता.  मंडळ अधिकारी लक्ष्मण पवार यांनी सोमवारी काशिमीरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतलाय. फिर्यादीनुसार ६८ बांधकामांशी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. सरकारी जागेत अनधिकृत बांधकाम करणा-या आरोपींमध्ये भाजपाचे नगरसेवक परशुराम म्हात्रे, शिवसेनेच्या नगरसेविका अनिता पाटील यांच्यासह मीरा-भार्इंदर महापालिकेवर देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय.

परशुराम म्हात्रे यांचे कार्यालय व दुकान तर अनिता पाटील यांचे कार्यालय आहे. महापालिकेने बेकायदा वाचनालय बांधले आहे. तर बुधवारी ७ मार्च रोजी येथील अतिक्रमित बेकायदा बांधकामे तोडण्याची कारवाई हाती घेण्यात आली आहे. यामुळे सदर कारवाई टाळण्यासाठी नगरसेवकांसह संबंधितांची धावाधाव चालली आहे. विशेष म्हणजे पाटील व म्हात्रे या दोघा नगरसेवकांमधील वादंग जाहीर आहेत. पण या निमित्ताने मात्र दोन्ही नगरासेवक एकत्र आल्याचे समजते.

Web Title: 68 people, including two corporators of BJP-Sena, filed a complaint against the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.