ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ६८९ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:39 AM2021-03-06T04:39:12+5:302021-03-06T04:39:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाचे ६८९ रुग्ण आढळून आले असून, सहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाचे ६८९ रुग्ण आढळून आले असून, सहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या २ लाख ६८ हजार ३१९ झाली असून, ६ हजार २९० मृत्यूची नोंद झाली आहे.
ठाणे शहरात २०५ रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या ६३ हजार २७६ वर पोहोचली आहे. तर, तिघांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या १ हजार ३९४ झाली. कल्याण-डोंबिवलीत नवीन २१० रुग्ण सापडले असून, एकाचा मृत्यू आहे. या शहरात आतापर्यंत ६४ हजार १७६ बाधित असून १ हजार २०६ मृत्यू झाले आहेत.
उल्हासनगरमध्ये २२ रुग्ण आढळले. तर एकाचाही मृत्यू झालेला नाही. आता या शहरात ११,९४८ बाधित नोंदले असून मृत्यू संख्या ३७२ झाली आहे. भिवंडीत ११ रुग्ण असून, एकाही मृत्यूची नोंद नाही. येथे आता ६ हजार ८२४ बाधितांची तर, ३५५ मृतांची नोंद कायम आहे. मीरा-भाईंदरमध्ये ४४ रुग्ण सापडले असून एक मृत्यू नाही. या शहरात एकूण २७ हजार ३७१ बाधितांसह ८०४ मृतांची संख्या आहे.
अंबरनाथमध्ये नवीन १९ कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर, एकाचाही मृत्यू झालेला नाही. या शहरात एकूण ८ हजार ९०८ बाधितांसह मृतांची संख्या ३१५ आहे. बदलापूरला ४३ रुग्ण सापडल्याने एकूण बाधितांची संख्या १० हजार ०८५ वर पोहोचली आहे. येथे एकही मृत्यू न झाल्याने मृत्यूची संख्या १२७ आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात १३ रुग्णांचा शोध लागला असून एकही मृत्यू नाही. आतापर्यंत १९ हजार ६५२ बाधित झाले असून एकही मृत्यू नाही. त्यामुळे ५९७ मृत्यूची नोंद कायम आहे.
-------------