फसगत झालेल्या महिलेला परत मिळाले ७ लाख

By धीरज परब | Published: March 6, 2024 05:29 PM2024-03-06T17:29:38+5:302024-03-06T17:30:33+5:30

लाईक व रेटिंगचे काम घरबसल्या करून पैसे कमावण्याचे आमिष दाखवून सायबर लुटारूंनी एका महिलेचे लुबाडलेले ७ लाख रुपये काशीमीरा पोलिसांनी परत मिळवून दिले आहेत. 

7 lakhs was returned to the cheated woman | फसगत झालेल्या महिलेला परत मिळाले ७ लाख

फसगत झालेल्या महिलेला परत मिळाले ७ लाख

मीरारोड - लाईक व रेटिंगचे काम घरबसल्या करून पैसे कमावण्याचे आमिष दाखवून सायबर लुटारूंनी एका महिलेचे लुबाडलेले ७ लाख रुपये काशीमीरा पोलिसांनी परत मिळवून दिले आहेत. 

काशीमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या जिग्ना मेहता यांना वर्कफ्रोम होम म्हणून युट्युब व्हिडीओ, हॉटेल, चित्रपट यांना लाईक व रेटिंग देण्याच्या बदल्यात तसेच गुंतवणूकमध्ये चांगले पैसे मिळतील असे अनोळखी सायबर लुटारूंनी सांगितले होते. 

जिग्ना यांनी विश्वास ठेऊन अनोळखी व्यक्तींना प्रतिसाद दिला असता त्यात सायबर लुटारूंनी त्यांची ७ लाख रुपयांना फसवणूक केली होती. त्या अनुषंगाने गेल्यावर्षी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे, पोलीस निरीक्षक राहुल सोनावणे, उपनिरीक्षक निखिल चव्हाण , हवा . दिनेश आहेर यांनी ह्या सायबर गुन्ह्याचा तपास चालवला होता. 

पोलिसांनी जिग्ना यांच्या ऑनलाईन व्यवहारांची माहिती घेत त्याची पडताळणी केली असता फसवणुकीची रक्कम विविध बँक खात्यात वळती झाली होती . पोलिसांनी ती रक्कम गोठवण्यासाठी संबंधित बँकांना पत्रव्यवहार केला व प्रत्यक्ष पाठपुरावा केला . फसवणुकीची रक्कम गोठवण्यात यश आल्यानंतर ठाणे न्यायालयाच्या आदेशाने पोलिसांनी फसवणुकीची ७ लाख रुपये इतकी पूर्ण रक्कम जिग्ना यांच्या बँक खात्यात वळती करण्यास लावली. 

Web Title: 7 lakhs was returned to the cheated woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.