भाईंदरमध्ये ७ वर्षाच्या मुलीचा वाहनाच्या धडकेने मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2023 16:28 IST2023-08-19T16:28:22+5:302023-08-19T16:28:36+5:30
मजुरी काम करणारे विकी पवार हे पत्नी व ३ मुलांसह स्मशानभूमी मार्गावर गल्ली क्रमांक ७ मध्ये राहतात.

भाईंदरमध्ये ७ वर्षाच्या मुलीचा वाहनाच्या धडकेने मृत्यू
मीरारोड - भाईंदर पश्चिमेच्या भोला नगर भागात एका ७ वर्षाच्या मुलीचा भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला. पोलिसांनी वाहन चालकास अटक केली आहे.
मजुरी काम करणारे विकी पवार हे पत्नी व ३ मुलांसह स्मशानभूमी मार्गावर गल्ली क्रमांक ७ मध्ये राहतात. शुक्रवारी रात्री त्यांची ७ वर्षांची मुलगी ज्योती ही रस्त्यावर खेळात होती. सव्वा ८ च्या सुमारास बाहेर गोंधळ ऐकून पवार हे गेले असता ज्योती ही रक्तबंबाळ होऊन पडलेली होती.
त्याच भागात राहणारा विशाल शाह ( ३० ) याने त्याची पिकअप मालवाहू गाडी भरधाव चालवत ज्योतीला धडक दिल्याचे समजले. तीळ नजीकच्या भीमसेन जोशी सरकारी रुग्णालयात नेले असता काही वेळाने डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. भाईंदर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून शाह याला अटक केली आहे .