महापालिकेच्या 7 हजार कामगारांचे रखडले पगार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2020 12:11 PM2020-03-05T12:11:09+5:302020-03-05T12:17:03+5:30
5 मार्च उजाडला तरी पगार नाही म्हणून कामगारांचे महिन्याचे गणित बिघडले आहे.
ठाणे - ठाणे महापालिका कामगारांचे पगार रखडले असल्याची बाब समोर आली आहे. महापालिकेतील 7 हजार कामगारांना याचा फटका बसला आहे. आयुक्त संजीव जयसवाल मेडिकल रजेवर जाताच कामगारांचे पगार रखडल्याने कामगार चिंतेत सापडले आहेत. महिन्याच्या 1 किंवा 2 तारखेला आधी पगार निघत होते. मात्र आता 5 मार्च उजाडला तरी पगार नाही म्हणून कामगारांचे महिन्याचे गणित बिघडले आहे.
मार्च एडिंग असल्याने हा घोळ झाला असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. तसेच दोन दिवसांत पगार होतील असेही पालिकेने म्हटलं आहे. मार्च महिनाअखेर कर्मचाऱ्यांच्या वेतनामधून आयकर कपात करण्यात येत असल्याने वेतन अदा करण्यासाठी थोडा विलंब लागला आहे. 5 मार्च रोजी सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यात येत असल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागाने दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Big Breaking : भारतीय महिला संघाची ICC Women's T20 World Cupच्या अंतिम फेरीत धडक
China Coronavirus : आता 'कोरोना'लाही विम्याचं कवच? कंपन्यांकडून तयारी सुरू
Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यांवर पाच वर्षांत 446 कोटींचा खर्च
China Coronavirus : 'राहुल गांधींनी कोरोना चाचणी केली का?', भाजपा खासदाराचा सवाल
भाजप सरकारच्या काळात २000 कोटींची अनियमितता, कॅगचा ठपका