पाणी पुरवठ्यासाठी पालिकांना 701 कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2020 03:05 AM2020-11-15T03:05:57+5:302020-11-15T03:06:08+5:30

मुंबई, पुणे, ठाणे, नागपूरसह औरंगाबादचा समावेश

701 crore to municipalities for water supply | पाणी पुरवठ्यासाठी पालिकांना 701 कोटी

पाणी पुरवठ्यासाठी पालिकांना 701 कोटी

googlenewsNext

- नारायण जाधव
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : पंधराव्या वित्त आयोगांतर्गत महाराष्ट्रातील ‘मिलियन प्लस’ आणि ‘नॉन मिलियन’ शहरांना पावसाचे पाणी साठविण्यासह पाणीपुरवठ्यासाठी ७०१ कोटी ५० लाख रुपयांचे भरघोस अनुदान मिळाले आहे. यात पाणीपुरवठा सुधारण्यासाठी ३९६ कोटी ५० लाखांचे अनुदान ‘मिलियन प्लस’ महानगरांना दिले असून, ३०५ कोटींचे अनुदान ‘नॉन मिलियन’ शहरांना देण्यात येणार आहे. यात ठाणे जिल्ह्याचा मोठा फायदा हाेणार आहे.


पाणीपुरवठ्यात सुधारणेसह घनकचरा व्यवस्थापनासाठी राजधानी मुंबईला सर्वाधिक १५९ कोटी तीन लाख सात हजार ८९ रुपये, तर पुणे ४१ कोटी ४६ लाख २२ हजार २८४, नागपूर ३३ कोटी, औरंगाबाद १५ कोटी ७५ लाख ७९ हजार रुपये मिळणार आहेत. तर नाशिक १९ कोटी ७८ लाख आठ हजार ४६८, पिंपरी-चिंचवडला २२ कोटी ९९ लाख ३२ हजार ४४६ मिळणार आहेत.


ठाणे जिल्ह्यात ठाणे महापालिका २३ कोटी २४ लाख ७६ हजार ९५९, नवी मुंबई १४ कोटी ३२ लाख २१ हजार ३८०, केडीएमसी १५ कोटी ९४ लाख २५ हजार ६१५, मीरा-भाईंदर १० कोटी ४१ लाख २४ हजार १५९ तरतूद करण्यात आली आहे.

हवेच्या गुणवत्तेसाठी...
n हवेच्या गुणवत्तेसाठी जे ३९६.५० कोटी मिळणार आहेत, त्यात औरंगाबाद नागरी समुहाला १६ कोटी मिळणार आहे.
n मुंबई नागरी समूह २४४ कोटी, नागपूर नागरी समूह ३३ कोटी, नाशिक नागरी समूह २०.५० कोटी, पुणे नागरी समूह ६७ कोटी आणि वसई-विरार मनपास १६ कोटींचा लाभ होणार आहे.
n यातून या महानगरांनी आपल्या क्षेत्रातील हवा गुणवत्ता सुधारण्याचे प्रयत्न करायचे आहेत.

Web Title: 701 crore to municipalities for water supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.