भिवंडीत एटीएममधून पैसे काढताना नागरिकाची ७२ हजारांची फसवणूक
By नितीन पंडित | Published: April 18, 2023 08:18 PM2023-04-18T20:18:52+5:302023-04-18T20:18:52+5:30
शहरातील बाला कंपाऊंड परिसरात राहणारे कौसर लतीफ खान वय ४७ हे सोमवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास बागे फिर्दोस खंडू पाडा येथील युनियन बँकेचे ए टी एम मधून पैसे काढीत असताना पैसे निघाले नाहीत.
भिवंडी - बँक व्यवहारा बाबत अधिक माहिती नसल्याचा फायदा घेत एका भामट्याने बँक ग्राहकाची तब्बल ७२ हजार रुपयांची फसवणूक केली आहे.
शहरातील बाला कंपाऊंड परिसरात राहणारे कौसर लतीफ खान वय ४७ हे सोमवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास बागे फिर्दोस खंडू पाडा येथील युनियन बँकेचे ए टी एम मधून पैसे काढीत असताना पैसे निघाले नाहीत. त्यावेळी त्यांच्या मागे उभ्या असलेल्या व्यक्तीने त्यांच्या एटीएम चा पिन नंबर बघून घेवून हातचलाखीने आपल्या जवळील बनावट एटीएम कार्ड त्याच्या हाती देवून त्यास पैसे काढण्याची प्रक्रिया समजावत तेथून पळ काढला.
त्यानंतर आरोपीने दुसऱ्या ठिकाणी जावून कौसर लतीफ खान याच्या एटीएम कार्डचा वापर करीत ७२ हजार रुपयांची चोरी केली.या बाबत बँक ग्राहकाने दिलेल्या तक्रारी वरून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.