ठाणे जिल्ह्यात ७२९ कोरोनाबाधित, मृतांचा आकडा २१ वर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 04:36 AM2020-04-28T04:36:06+5:302020-04-28T04:36:16+5:30
तर कल्याण डोंबिवलीत नव्याने सापडलेल्या ८ रुग्णांमध्ये खाजगी रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचारी महिला, कर्मचारी, शासकीय परिवहन विभागातील चालक, बँक कर्मचारी यांचा समावेश आहे.
ठाणे : रविवारी जिल्ह्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने आणि सोमवारीही ४४ नवे रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णांची संख्या ही ७२९ इतकी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक १५ रुग्ण हे ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात मिळून आल्याने आतापर्यंत येथील रुग्णांची संख्या २४१ इतकी झाली आहे.
सोमवारी आणखी एकाचा मृत्यू झाला असून शहरातील मृतांची संख्या ही ९ तर जिल्ह्यातील मृतांचा आकडा २१ वर गेला आहे. तर कल्याण डोंबिवलीत नव्याने सापडलेल्या ८ रुग्णांमध्ये खाजगी रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचारी महिला, कर्मचारी, शासकीय परिवहन विभागातील चालक, बँक कर्मचारी यांचा समावेश आहे.
ठाणे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधीत रु ग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. असे असले तरी, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना आखण्यात येत आहे. मात्र ठाण्यातील रुग्णांची संख्या ही आता रोजच्या रोज दुपटीने वाढतांना दिसत आहे. रविवारी १७ रुग्ण आढळल्यानंतर सोमवारी ठाणे पालिकेच्या हद्दीत एकाच दिवशी १५ नवीन रु ग्णांची नोंद झाली असून त्यात एकाचा मृत्यू झाली आहे. त्यामुळे शहरातील कोरोनाबाधीतांची संख्या २४१ वर पोहोचली आहे. तर मृतांचा आकडा नऊ झाला आहे. तसेच कल्याण डोंबिवलीत आठ नव्या रु ग्णांची नोंद झाली असून रु ग्णांची संख्या १३७ वर गेली आहे. तर नवी मुंबई महापालिका क्षेत्रात १५ नव्या रु ग्णाची नोंद झाली असून तेथील रु ग्ण संख्या १४७ इतकी झाली असून आतापर्यंत एकाचा मृत्यू झाला आहे.
उल्हासनगर महापालिका क्षेत्रात एका रु ग्णांची नोंद झाल्याने तेथील आकडा तीन वर पोहोचला आहे. तर बदलापूरमध्ये तीन बाधित नव्या रु ग्णांची नोंद झाल्याने तेथील आकडा २० वर पोहोचला आहे.
>ग्रामीण भागात एकही नवा रुग्ण नाही
मीरा भार्इंदर, भिवंडी, अंबरनाथ आणि ठाणे ग्रामीण भागात एकही नव्या
रु ग्णाची नोंद झाली नसल्याची माहिती जिल्हा रु ग्णालय प्रशासनाने दिली.