चांगल्या रस्त्याच्या निर्मितीवर ७४ लाख उधळणार

By admin | Published: April 25, 2016 02:54 AM2016-04-25T02:54:42+5:302016-04-25T02:54:42+5:30

सरावली मानफोडपाडा येथील रहिवाशांच्या रस्त्याच्या वर्षानुवर्षाच्या मागणीकडे डोळेझाक करणारी नगरपरिषद मात्र सुस्थित असलेल्या पटेलपाडा रस्त्यावर 74 लाखाची उधळपट्टी

74 lakhs of good road construction will be eroded | चांगल्या रस्त्याच्या निर्मितीवर ७४ लाख उधळणार

चांगल्या रस्त्याच्या निर्मितीवर ७४ लाख उधळणार

Next

शौकत शेख, डहाणू
सरावली मानफोडपाडा येथील रहिवाशांच्या रस्त्याच्या वर्षानुवर्षाच्या मागणीकडे डोळेझाक करणारी नगरपरिषद मात्र सुस्थित असलेल्या पटेलपाडा रस्त्यावर 74 लाखाची उधळपट्टी करण्यास उतावळी झाली आहे. त्यामुळे ही नगरपरिषद केवळ उच्चवर्गीयांच्या विकासासाठीच असल्याची भावना डहाणूतील नागरीक व्यक्त करु लागले आहेत.
तसेच इतक्या मोठ्या कामाला मंजूरी देण्याबाबतचा कोणताही ठराव नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर झालेला नसल्याचे नगरसेवकांकडून सांगण्यात येत असून या कामाची प्रशासकीय मान्यता तपासून त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात येणार असल्याचे समजते. त्यामुळे डहाणू पटेल पाडा अंतर्गत रस्ता वादात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.तसेच भाजपचे खासदार चिंतामण वनगा, माजी आमदार मनीषा निमकर आणि आमदार पास्कल धनारे यांनी यापूर्वीच डहाणू नगरपरिषदेत मागील 2 वर्षात झालेली दलित वस्तीच्या विकासाची कामे तसेच बाजार कर निविदा याची चौकशी व्हावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे. त्यानंतर काही दिवसातच पटेलपाडा येथील रस्त्यावर गरज नसतांना 74 लाखाचा नाहक खर्च करण्याचा प्रयत्न उजेडात आल्याने डहाणू नगर परिषदेत एका नवीन वादाला तोंड फुटले आहे.
डहाणू नाशिक राज्यामार्गाला जोडून पटेल पाडा अंतर्गत रस्ता मागील 2 वर्षापूर्वी तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये कोणतीही अवजड वाहतूक नसल्याने रस्ता सुस्थितीत आहे, असे असताना डहाणू नगर परिषदेने रस्ते अनुदानानातून पटेलपाडा अंतर्गत रस्त्याच्या डांबरीकरण आणि रु ंदीकरणासाठी तब्बल 74 लाखाची कामाची वर्कआॅर्डर मंजूर केली आहे.
त्यामुळे डहाणू नगरपरिषदेकडून ही पैशाची उधळपट्टी असल्याची टीका विरोधकांकाडून होत आहेत. तर काही नगरसेवकांचे या ठेक्यात पडद्याआडून हितसंबंध गुंतले असल्याचीही जोरदार चर्चा होत आहे. त्यामुळे पटेल पाडा अंतर्गत रस्त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकामध्ये जुंपण्याची चिन्हे आहेत. 500 मीटरच्या या आंतर्गत रस्त्यावर 74 लाखांची उधळपट्टी कोणाच्या चांगभल्यासाठी होते आहे. याचीच चर्चा सध्या शहरात सुरु आहे.

Web Title: 74 lakhs of good road construction will be eroded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.