ठाणे जिल्ह्यातील १५८ ग्राम पंचायतींसाठी आजपर्यंत ७५ उमेदवारी अर्ज दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2020 09:08 PM2020-12-24T21:08:52+5:302020-12-24T21:09:08+5:30
Gram panchayat Election : जिल्ह्यात ४३१ ग्राम पंचायती कार्यरत आहेत. त्यापैकी डिसेंबरपर्यंत मुदत संपणाऱ्या या १५८ ग्राम पंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यातील १५८ ग्राम पंचायतीच्या निवडणुकीसाठी बुधवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे. आजच्या दिवशी ६७ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले. यास आजच्या दिवसापर्यंत जिल्ह्यातील या ग्राम पंचायतींसाठी इच्छूक उमेदवारांनी ७५ अर्ज आँनलाइन दाखल केले आहेत. या इच्छुकांना ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे.
जिल्ह्यात ४३१ ग्राम पंचायती कार्यरत आहेत. त्यापैकी डिसेंबरपर्यंत मुदत संपणाऱ्या या १५८ ग्राम पंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. जिल्ह्यातील या ग्राम पंचायतींच्या एक हजार ३८१ उमेदवारांसाठी मतदान होणार आहे. यासाठी ६११ मतदान केंद्र निश्चित केलेले असून त्यावर तीन लाख चार हजार ९६० मतदारांच्या मतदानाचे नियोजन केलेले आहे. त्यास अनुसरुन गुरुवारपर्यंत ७५ उमेदवारांनी उमेदवारी दाखल केली आहे. यापैकी कल्याण १२ अर्ज, अंबरनाथला नऊ, मुरबाडला दोन, भिवंडीला ३१ आणि शहापूरला २१ उमेदवारी अर्ज प्राप्त झालेले आहेत. या उमेदवारी अर्जांची ३१ डिसेंबररोजी छाननी असून ४ जानेवारीला उमेदवारी मागे घेण्याची शेवटची संधी देण्यात आलेली आहे.