कोरोनाचे ७६ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:45 AM2021-08-25T04:45:29+5:302021-08-25T04:45:29+5:30
---------------------- आज लसीकरण नाही कल्याण : सरकारकडून लसीचा साठा उपलब्ध होऊ न शकल्याने बुधवारी केडीएमसी हद्दीत मनपाच्या सर्व ...
----------------------
आज लसीकरण नाही
कल्याण : सरकारकडून लसीचा साठा उपलब्ध होऊ न शकल्याने बुधवारी केडीएमसी हद्दीत मनपाच्या सर्व लसीकरण केंद्रांवर कोविड लसीकरणाची सुविधा बंद राहील, अशी माहिती वैद्यकीय आरोग्य विभागाने दिली आहे.
------------------------
दुचाकी चोरी
डोंबिवली : पूर्वेतील पलावा सिटी कासा रिओमध्ये राहणारे आदित्य आवारे यांची दुचाकी त्यांनी ते राहत असलेल्या सोसायटीत पार्क केली होती. तेथून ती गाडी चोरीला गेल्याची घटना २४ मे ते १६ ऑगस्टदरम्यान घडली. दरम्यान, याप्रकरणी आवारे यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
-------------------------------------
रिक्षाची चोरी
कल्याण : बाजीराव खाजेकर यांनी त्यांची रिक्षा ते राहत असलेल्या वाडेघर परिसरातील चंदनशिवे नगरमध्ये पार्क केली होती. तेथून ती रिक्षा चोरीला गेल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
--------------------------------
रद्दी संकलन मोहीम
डोंबिवली: विवेकानंद सेवा मंडळ एमयुएसई प्रकल्पांतर्गत वनवासी महिलांच्या सक्षमीकरणासाठी दोन दशके काम करीत आहे. शहापूर तालुक्यातील विहिगाव येथील वनवासी महिला या वर्तमानपत्रांपासून कागदी पिशव्या बनवितात. या पिशव्या मेडिकल, डॉक्टर अथवा रुग्णालयात औषधे भरण्यासाठी वापरात येतात. तसेच त्याचा फायदा पर्यावरणाला होत आहे. नागरिकांनी सहभागी होऊन घरातील वर्तमानपत्राची रद्दी संस्थेत आणून द्यावी, असे आवाहन मंडळाने केले आहे. सोमवारपासून हा उपक्रम सुरू झाला असून, तो ३१ ऑगस्टपर्यंत दुपारी २ ते ७ पर्यंत चालणार आहे.
------------------------------------