उल्हासनगर पोलीस परिमंडळात ७६ टक्के गुन्हे उघड; पोलीस उपायुक्त सचिन गोरे
By सदानंद नाईक | Updated: January 2, 2025 18:31 IST2025-01-02T18:31:11+5:302025-01-02T18:31:27+5:30
२ गुंडावर एमपीडीए अंतर्गत तर ५६ जणावर हद्दपारीची कारवाई

उल्हासनगर पोलीस परिमंडळात ७६ टक्के गुन्हे उघड; पोलीस उपायुक्त सचिन गोरे
सदानंद नाईक, उल्हासनगर : पोलीस परिमंडळातील एकूण २७६ गुन्ह्या पैकी ७६ टक्के गुन्हे उघड झाल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन दिली. तसेच दोन गुंडावर एमपीडीए तर ५६ जणावर हद्दपारीची कारवाई केली असून ४८५ पोलीस मित्राची नोंदणी केली आहे.
उल्हासनगर पोलीस परिमंडळचे पोलीस आयुक्त सचिन गोरे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन परीमंडळ अंतर्गत घडलेल्या गुन्ह्यांची माहिती दिली. एकूण २७६ गुन्ह्या पैकी ७६ टक्के गुन्हे उघड करण्यास पोलिसांना यश आल्याची माहिती दिली. वर्षभरात एकूण १७ खुणाच्या घटना घडल्या असून १७ ही गुन्हे उघड झाले. बलात्काराच्या ५० पैकी ५० उघड, विनयभंगाच्या ९२ पैकी ८८ उघड, पॉकसोच्या १३५ पैकी १३४ गुन्हे उघड, चेन स्नॅचिंगच्या ५२ पैकी ४६ उघड, दारूबंधीचे ५६७ पैकी ५६७ उघड झाली. याशिवाय घरफोडीच्या १४० गुन्हे दाखल असून वाहन चोरीच्या २४८ गुन्हे दाखल झाल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली. भाग १ ते ५ अन्वये २ हजार ६५६ गुन्हे तर भाग ६ अन्वये ४ हजार ३९२ गुन्हे दाखल झाली आहेत.
महिला सबंधित बलात्कार, विनयभंग, छळवणूक व अपहरणाचे एकूण ६०३ गुन्ह्यांची नोंद झाली असून गेल्या वर्षी पेक्षा यामध्ये घट झाल्याची माहिती गोरे यांनी दिली. वर्षभरात एमपीडीए अंतर्गत २ गुंडावर तर ८ जणावर हद्दपारीची व हद्दपार शिक्षेचा भंग केल्या प्रकरणी ४६ गुंडावर कारवाई केली. घरफोडी, वाहने, सोने चोरीच्या गुन्ह्यातील एकूण १ कोटी ४४ लाख १९३ रुपयाचा जप्त मुद्देमाल नागरिकांना परत केला. तसेच पोलिसांना मदत करणाऱ्या ४८५ पोलीस मित्राची नोंद करण्यात आली असून नोंद झालेल्या एकूण ८४१ जेष्ठ नागरिकांची पोलीस घरी जाऊन चौकशी व मदत करीत असल्याची माहिती गोरे यांनी दिली. याशिवाय शाळा व कॉलेज मध्ये जाऊन गुन्ह्या बाबत एकूण ४१७ जनजागृती कार्यक्रमात करण्यात आले आहे. एकूण वार्षिक गुन्ह्याच्या आढाव्यात पोलीस गुन्हे उघड करण्यात गेल्या वर्षी पेक्षा यश मिळाले आहे.