जिल्हा बँकेत ७७ कोटींच्या जुन्या नोटा; व्याजाचा भुर्दंड!

By admin | Published: June 2, 2017 05:38 AM2017-06-02T05:38:00+5:302017-06-02T05:38:00+5:30

सुमारे ७६ कोटी ७८ लाख २७ हजार ५०० रुपयांच्या जुन्या हजार, पाचशेच्या नोटा अद्यापही ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी

77 crore old notes in district bank; Interest of interest! | जिल्हा बँकेत ७७ कोटींच्या जुन्या नोटा; व्याजाचा भुर्दंड!

जिल्हा बँकेत ७७ कोटींच्या जुन्या नोटा; व्याजाचा भुर्दंड!

Next

सुरेश लोखंडे/लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : सुमारे ७६ कोटी ७८ लाख २७ हजार ५०० रुपयांच्या जुन्या हजार, पाचशेच्या नोटा अद्यापही ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेच्या तिजोरीत पडून आहेत. एवढेच नव्हे तर या रकमेवर प्रत्येक दिवशी ८४ हजार २४० रुपये व्याजाचा भुर्दंड बँकेला बसत आहे.
हजार, पावशेच्या सुमारे ७७ कोटींच्या या जुन्या नोटा रिझर्व्ह बँकेने वेळीच ताब्यात घेणे अपेक्षित होते. सुमारे २०० दिवसांपासून त्या टीडीसीसी बँकेत पडून आहेत. त्यापोटी बँकेने आतापर्यंत एक कोटी ८६ लाख ४८ हजार रुपये व्याजापोटी भरल्याच्या वृत्तास टीडीसीसीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी दुजोरा दिला आहे. शेतकऱ्यांची ही बँक असून त्यांची कर्जमाफी करण्याऐवजी जुन्या नोटांवरील व्याजापोटी बँकेची लूट होत असल्याचा आरोप करून शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
सुमारे ५० कोटी ८२ लाख ४७ हजार रुपये एक हजारच्या नोटांचे आहेत. यामध्ये एक हजारच्या पाच लाख आठ हजार २४७ नोटा आहेत. उर्वरित २५ कोटी ९५ लाख ८० हजार ५०० रुपये ५०० च्या नोटांमध्ये आहेत. यात पाच लाख १९ हजार १६१ नोटा पाचशेच्या आहेत. या सर्व ७६ कोटी ७८ लाख २७ हजार ५०० च्या रकमेवर ४ टक्के व्याजदराने दिवसाकाठी सुमारे ८४ हजार २४० रुपये व्याजापोटी भरावे लागत आहेत. हा भुर्दंड टाळण्यासाठी बँकेने वेळोवेळी रिझर्व्ह बँकेकडे पत्रव्यवहार केला आहे. मात्र, त्यावर अद्यापही सकारात्मक निर्णय झाला नसल्याचे पाटील यांनी सांगितले.
नोटाबंदी झाली, त्या वेळी बँकेच्या एक लाख १९ हजार खातेदारांनी २८८ कोटी ७२ लाख रुपये हजार, पाचशेच्या नोटांद्वारे जमा केले होते. सुमारे १०१ शाखांमधून जमा झालेली ही रक्कम बँकेच्या मुख्य कार्यालयात जमा करण्यात आली. तत्पूर्वी बँकेकडे ३८ कोटी एक लाख ४२ हजारांच्या हजार, पाचशेच्या नोटा होत्या. या नोटाबंदीच्या काळात बँकेकडे ३२६ कोटी ७४ लाख रुपये या जुन्या नोटा होत्या.

नाबार्डसह ईडीने केली तपासणी

उर्वरित ७६ कोटी ७८ लाख २७ हजार रुपयांच्या जुन्या नोटा बँकेत आहेत. नाबार्डने या जुन्या नोटांची तीन वेळा पाहणी करून शहानिशा केली आहे. याशिवाय, सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) या रकमेची एक वेळ तपासणी करून खात्री करून घेतली आहे. या नोटा रिझर्व्ह बँक जोपर्यंत स्वीकारत नाही, तोपर्यंत बँकेला दर दिवसाच्या व्याजाचा भुर्दंड सोसावा लागत असल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. या रकमेवरील चार टक्के व गुंतवणुकीअभावी सुमारे आठ टक्के आदी सुमारे १२ टककयांपेक्षा जास्त नुकसान बँकेचे होत असल्याचे दिसून येत आहे. बँकेचे म्हणजेच शेतकऱ्यांचे दरदिवशी व्याजापोटी हजार रुपयांचे नुकसान होत असल्याची चर्चा आहे.

Web Title: 77 crore old notes in district bank; Interest of interest!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.