कोरोनाच्या लढाईत ७९ वर्षांच्या वैद्यकीय अधिकाऱ्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 04:38 AM2020-04-28T04:38:09+5:302020-04-28T04:38:20+5:30
कोरोनामुळे त्याचा शनिवारी मृत्यू झाला आहे. आतापर्यंत शहरात अशा ११ लढवय्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये त्यांच्या घरातील सदस्यही भरडले जात आहेत.
अजित मांडके
ठाणे : कोरोनावर मात करण्यासाठी तसेच रुग्णांना उपचार देण्यासाठी अनेक लढवय्ये आपली लढाई लढत आहेत. ठाण्यातील असाच एक ७९ वर्षीय लढवय्या वैद्यकीय अधिकारी मात्र हा या लढाईत अपयशी ठरला आहे. कोरोनामुळे त्याचा शनिवारी मृत्यू झाला आहे. आतापर्यंत शहरात अशा ११ लढवय्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये त्यांच्या घरातील सदस्यही भरडले जात आहेत.
एकीकडे शहरात अनेक वैद्यकीय सेवा देणाऱ्यांनी आपली क्लिनिक या काळात बंद केली आहेत. केवळ काही ठरावीक मंडळीनीच महापालिकेच्या माध्यमातून तीसुरूठेवली आहेत. परंतु, या आजाराला न घाबरता या ७९ वर्षीय योद्ध्याने आपले पाचपाखाडी भागातील क्लिनिक सुरू ठेवले होते. या लढवय्याला चालताही येत नव्हते. परंतु, आपले समाजासाठी काहीतरी देणे लागते या उद्देशाने त्यांने घरच्या मंडळीचा विरोध डावलून तो इतर आजारावरील रुग्णांसाठी उपचार देण्यासाठी क्लिनिकमध्ये जात होता. परंतु, एका रुग्णाकडूनच त्याला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर त्याला उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले. शेवटच्या श्वासापर्यंत हा योद्धा लढत होता. परंतु, शनिवारी त्याचा मृत्यू झाल्याने त्याची लढाई अर्धवट राहिली. तसेच त्यांची पत्नी आणि नातवालाही कोरोनाची लागण झाली आहे. तर अन्य कोरोनाबाधित वैद्यकीय अधिकाºयांच्या कुटुंबातील काहींना बाधा झाली आहे.
या लढाईत लढ म्हणा असे शासन जरी सांगत असले तरी त्यांना आवश्यक ते साहित्यही पुरविले जात नसल्याची खंत अधिकाºयांनी व्यक्त केली. इतर ठिकाणी अत्यावश्यक सेवा देणाºयांसाठी रुग्णालयांत वेगळे बेड ठेवण्यात आले आहेत. ठाण्यातही तशी वेगळ्या बेडची तरी व्यवस्था करावी, अशी मागणीही केली आहे.
>वेगळ्या बेडची व्यवस्था करावी
आम्ही या लढाईत सज्ज आहोत. मात्र, शासनाकडून जे साहित्य मिळणे अपेक्षित आहे ते आम्हाला मिळत नाही. या लढाईत आमचे कुटुंबही भरडले जात आहे. तसेच किमान वेगळ्या बेडची तरी रुग्णालयात व्यवस्था करावी हीच आमची अपेक्षा आहे.
- डॉ. संतोष कदम, सचिव-इंडियन मेडिकल असोसिएशन, ठाणे