भिवंडी पालिका क्षेत्रात ८९३ बेकायदा बांधकामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2019 12:23 AM2019-06-09T00:23:30+5:302019-06-09T00:23:51+5:30
मुख्यमंत्र्यांकडे तक्रार । अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी
भिवंडी : महापालिका हद्दीत बेकायदा बांधकामांना थारा देऊ नये, असे सक्त आदेश पालिका प्रशासनाला दिलेले आहेत. असे असतानाही प्रभाग-१, २ व ३ मध्ये गेल्या वर्षभरात ८९३ बेकायदा बांधकामे उभी राहिली असून या बांधकामांमुळे पालिकेचे दीडशे कोटींचे नुकसान झाले. पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना नुकसानीला उपायुक्त व प्रभाग समिती अधिकाऱ्यांसह बीट निरीक्षक जबाबदार आहेत. त्यामुळे सरकार व आयुक्तांनी चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी माजी नगरसेवक नासीर सय्यद यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तसेच आयुक्त मनोहर हिरे यांच्याकडेही लेखी तक्र ार दिली आहे.
वर्षभरात प्रभाग समिती-१ व २ अंतर्गत ८९३ पेक्षा जास्त बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत. नागरिक, नगरसेवक यांनी तक्रार करताच पालिका अधिकारी नोटीस बजावून एमआरटीपीअंतर्गत पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करतात. त्यानंतर, पुन्हा बेकायदा बांधकामे उभी राहतात. गेल्या वर्षात विविध पोलीस ठाण्यांत ३२ तक्र ारी दाखल झाल्या आहेत. बºयाच वेळेला अधिकारीवर्ग इमारत तोडण्याच्या बहाण्याने पोलिसांचा वापर करून घेत असल्याचा आरोप नासीर सय्यद यांनी केला आहे. मिल्लतनगर, नागाव, गैबीनगर, आमपाडा, भादवड, टेमघर, शास्त्रीनगर, पिराणीपाडा, कल्याण रोड, पद्मानगर, शांतीनगर, गुलजारनगर, किडवाईनगर, चाविंद्रा, सुभाषनगर येथे सुरू असलेल्या इमारतींच्या बांधकामांची आयुक्त हिरे यांनी पाहणी करून या बेकायदा बांधकामास जबाबदार असलेल्या अधिकाºयांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी सय्यद यांनी केली आहे.
दरम्यान, या घटनांची दखल घेत अतिरिक्त आयुक्त अशोक रणखांब यांनी बेकायदा बांधकामांस प्रोत्साहन देणाºया अधिकाºयांवर कारवाई करावी, असे आदेश उपायुक्त दीपक कुरळेकर यांना दिल्याने खळबळ उडाली आहे.
भिवंडी महापालिका क्षेत्रात बेकायदा बांधकाम करणाºया व्यावसायिकांविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचे उल्लंघन करणाºया अधिकाºयांची चौकशी करून निलंबित केले जाईल. - मनोहर हिरे, आयुक्त