हॉटेलच्या लिफ्टमध्ये ८ जण अकडले; बाहेर काढण्यासाठी लागले तब्बल अडीच तास 

By धीरज परब | Published: December 9, 2022 07:49 PM2022-12-09T19:49:38+5:302022-12-09T19:49:50+5:30

फाउंटन नाका वरसावे येथे भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या कंपनीचे सी एन रॉक हॉटेल आहे.

8 people stuck in hotel elevator; It took two and a half hours to pull out in mira bhayander | हॉटेलच्या लिफ्टमध्ये ८ जण अकडले; बाहेर काढण्यासाठी लागले तब्बल अडीच तास 

हॉटेलच्या लिफ्टमध्ये ८ जण अकडले; बाहेर काढण्यासाठी लागले तब्बल अडीच तास 

googlenewsNext

मीरारोड - भाजपच्या माजी आमदाराच्या हॉटेलच्या लिफ्टध्ये अडकलेल्या ८ जणांना तब्बल अडीज तासांनी बाहेर काढण्यात आले . एरव्ही लिफ्ट मध्ये लोक अडकल्यास अग्निशमन दल लिफ्टचे भाग कापून आधी लोकांची सुटका करण्यास प्राधान्य देते . परंतु ह्यावेळी मात्र लिफ्ट उघडण्याची वाट तब्बल अडीज तास पाहण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 

फाउंटन नाका वरसावे येथे भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या कंपनीचे सी एन रॉक हॉटेल आहे. त्या ठिकाणी खाजगी कार्यक्रम साठी लोक आले आहेत . हॉटेलच्या लिफ्टची क्षमता ४ माणसांची असल्याचे लिहलेले असताना त्यात तब्ब्ल ८ जण गेले. वजनामुळे लिफ्ट तळ आणि पहिल्या मजल्याच्या दरम्यान बंद पडली. ही घटना साधारण साडे तीन ते चारच्या दरम्यान झाल्याचे सांगण्यात आले. 

माजी आमदाराच्या हॉटेलमध्ये लिफ्ट बंद पडून त्यात काहीजण अडकून पडल्याचा संदेश समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने काशीमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय हजारे यांच्यासह पोलीस पथक तसेच पालिकेचे अग्निशमन दलचे डोसन ढोल्या व पथक हॉटेल मध्ये ४ च्या सुमारास दाखल झाले. हॉटेल वाल्यानी लिफ्टची देखभाल करणाऱ्या तज्ज्ञांना पाचारण केले . 

आत अडकलेले ८ जण पाहून लिफ्टचा वरचा भाग व बाहेरचे दार कापून त्यांची तात्काळ सुटका करणे अपेक्षित होते .  तात्काळ कार्यवाही होत नसल्याची बाब समजल्यावर नंतर पालिकेच्या देवदूत रेस्क्यू वाहनाने अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांचे जगदीश पाटील , संजय पाटील, राजू मुकादम , लक्ष्मण भंडारी आदींचे आणखी एक पथक घटनास्थळी पाठवण्यात आले.सुमारे अडीज तासांनी म्हणजेच सहाच्या सुमारास लिफ्ट तळमजल्यावर आणण्यात यश आल्या नंतर आत अडकलेल्या ८ जणांची सुटका करण्यात आली. आत अडकलेल्यांची नोंद पोलिसांनी केली असून ते सर्व पटेल व जैन आडनावाचे होते. 

मुळात कार्यक्रमास गर्दी असल्याने व लिफ्टची क्षमता ४ माणसांची होती तर त्या ठिकाणी खबदरदारी म्हणून हॉटेल तर्फे कर्मचारी ठेवणे आवश्यक होते . तर अग्निशमन दल एरव्ही लिफ्टमध्ये कोणी अडकल्यास त्यांच्या सुटकेसाठी लिफ्टचा भाग कापण्याची कार्यवाही करतात तर यावेळी मात्र तब्बल अडीज तास आत अडकलेल्या ८ जणांची सुटका करण्यास का लावण्यात आले ? लोकांचा जीव महत्वाचा की लिफ्ट ?  असे सवाल जागरूक नागरिकांनी करत आहेत. 

Web Title: 8 people stuck in hotel elevator; It took two and a half hours to pull out in mira bhayander

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.