बनावट नावाने राहणारा खुनातील आरोपी 8 वर्षांनी अटक , उल्हासनगरची घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 01:36 AM2017-11-16T01:36:43+5:302017-11-16T01:36:56+5:30
गुन्हे विभागाने एका खुनातील आरोपीला तब्बल ८ वर्षांनंतर अटक केली. नाव बदलून राहणाºया अहमद करम हुसेन शहा याने आधारकार्डसह पॅनकार्ड काढून एका महिलेशी खोट्या नावाने लग्नही केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश बागलकोट यांनी दिली.
उल्हासनगर : गुन्हे विभागाने एका खुनातील आरोपीला तब्बल ८ वर्षांनंतर अटक केली. नाव बदलून राहणाºया अहमद करम हुसेन शहा याने आधारकार्डसह पॅनकार्ड काढून एका महिलेशी खोट्या नावाने लग्नही केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश बागलकोट यांनी दिली.
उल्हासनगरमधील बांधकाम व्यावसायिक बलराम टिकमदास मूलचंदानी यांचे संभाजी पवार यांच्यासोबत दुकानाच्या मालकीसंदर्भात वाद निर्माण झाले होते. पवार यांनी कपिलदेव मंडळ, फुलाराम चौधरी व अमजद करमहुसेन शहा या सहकारी मित्रांच्या मदतीने बलराम यांचे अपहरण करून २१ जानेवारी २००९ रोजी बदलापूर येथील फार्महाउसवर आणले. कागदापत्रांवर सही केली नाही, या रागातून चौघांनी त्यांचा धारदार हत्याराने हल्ला करून खून केला. तसेच मृतदेह गाडीमधून नेऊन पनवेल येथील वाकोडी जंगलात फेकून दिला.
बलराम यांच्या हत्येप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर, पोलिसांनी तपासानंतर संभाजी पवार, कपिलदेव मंडळ व फुलाराम चौधरी यांना अटक केली. मात्र, अमजद करमहुसेन शहा फरार होता.
शहा नगर येथे खोट्या नावाने राहत असल्याची माहिती गुन्हे विशेष विभागाला मिळाली. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश बागलकोट यांनी पथकाला नगर येथे पाठवून अमजद याला अटक
केली.
पोलीस ठाण्यात आल्यावर पोलिसी खाक्या दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली. अमजद याने साहिल करमहुसेन खान हे खोटे नाव धारण करून आधारकार्डसह पॅनकार्ड काढले. तसेच खोट्या नावाने एका महिलेसोबत लग्न केल्याची माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेत
दिली.
दुकानाच्या वादातून हत्या-
संभाजी पवार व बलराम मूलचंदांनी हे दोघे व्यवसायाने बिल्डर होते. दुकानाच्या वादातून मूलचंदानी याचे अपहरण करून फार्म हाऊसवर निर्घृणपणे हत्या केली.
यातील अमजद करमहुसेन शहा याने बनावट नाव धारण करून गेली आठ वर्षे पोलिसांना गुंगारा देत होता.