वसईच्या एका घरातील ८० जण करणार देहदान

By admin | Published: January 19, 2016 02:03 AM2016-01-19T02:03:16+5:302016-01-19T02:03:16+5:30

आजोबांच्या २५ व्या स्मृतिदिनी लोपीस कुटुंबीयांनी देहदान करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर, देहदानासाठी नोंदणी करण्याची प्रक्रियादेखील सुरू करण्यात आली आहे.

80 people from Vasai's family made a donation | वसईच्या एका घरातील ८० जण करणार देहदान

वसईच्या एका घरातील ८० जण करणार देहदान

Next

वसई : आजोबांच्या २५ व्या स्मृतिदिनी लोपीस कुटुंबीयांनी देहदान करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर, देहदानासाठी नोंदणी करण्याची प्रक्रियादेखील सुरू करण्यात आली आहे. रजिस्ट्रेशनपूर्वी काही अनुचित प्रकार घडल्यास देहदान कराच, असा आग्रहही कुटुंबीयांनी केला आहे.
विरारजवळील उंबरगोठण गावातील लोपीस कुटुंबीयांच्या या निर्णयाचे वसईत स्वागत केले जात आहे. एकाच बंगल्यात लोपीस कुटुंबातील ८० सदस्य गुण्यागोविंदाने नांदत आहेत. आजोबा बसत्याव लोपीस यांच्या २५ व्या स्मृतिदिनानिमित्त देहदान, अवयवदान आणि नेत्रदानाविषयी प्रबोधन करण्यासाठी एलायस लोपीस यांनी कुुटुंबाकरिता व्याख्यान आयोजित केले होते. व्याख्यानाने प्रेरित होऊन लोपीस कुटुंबीयातील सर्वच सदस्यांनी देहदानाचा संकल्प सोडला.
देहदान आणि अवयवदान नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात
आली आहे. नोंदणी प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी बरेवाईट घडले तर देहदानाच्या तांत्रिक बाबींमध्ये अडकून न पडता आमची इच्छा पूर्ण करा, असे कुटुंबातील सर्व सदस्यांनी आवर्जून सांगितले.
देहदान चळवळीला सरकारी लालफितीच्या कारभारामुळे अडथळे येत असले तरी दुसरीकडे
वसईतील आगाशी गावातील एकाच कुटुंबातील ८० सदस्यांनी देहदान व अवयवदान करण्याचा निर्णय
घेतला आहे. देह आणि अवयवदानात ८० वर्षांच्या कुटुंबप्रमुखापासून
अगदी युवा पिढीतील सदस्यांनी सहभाग घेतला आहे. सामाजिक बांधीलकी मानणाऱ्या संपूर्ण
कुटुंबाने देहदानाचा निर्णय घेऊन एक आदर्श पायंडा सुरू केल्याची भावना वसईत व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 80 people from Vasai's family made a donation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.