ठाणे जिल्ह्यात ३५ ग्राम पंचायतींसाठी ८० टक्के मतदानाचा आंदाज, मंगळवारी मतमोजणी
By सुरेश लोखंडे | Published: December 18, 2022 07:28 PM2022-12-18T19:28:24+5:302022-12-18T19:28:43+5:30
जिल्ह्यातील कल्याण, भिवंडी, मुरबाड आणि शहापूर आदी तालुक्यांतील ३५ ग्राम पंचायतींसाठी आज तब्बल ७५ ते ८० टक्के मतदान ५.३० वाजेपर्यंत झाल्याचा आंदाज जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे.
ठाणे : जिल्ह्यातील कल्याण, भिवंडी, मुरबाड आणि शहापूर आदी तालुक्यांतील ३५ ग्राम पंचायतींसाठी आज तब्बल ७५ ते ८० टक्के मतदान ५.३० वाजेपर्यंत झाल्याचा आंदाज जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे.या मतदानाची मतमोजणी २० डिसेंबरला होणार आहे.
जिल्ह्यातील या मतदानादरम्यान कल्याणच्या वासुंद्री ग्राम पंचायतीच्या कार्यक्षेत्रातील ग्रामस्थांमध्ये शाब्दीक बाचाबाची घटना घडल्याचे सांगितले जात आहे. जिल्ह्यातील ४२ पैकी सात ग्राम पंचायतीं आधीच बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. उर्वरित ३५ ग्राम पंचायतींसाठी १३७ केंद्रांवर आज मतदान झाले. यासाठी ६५ हजार ५०७ मतदारांपैकी शेवटच्या क्षणापर्यंत ७५ ते ८० टक्के जणांनी मतदान केल्याचा आंदाज व्यक्त करण्यात आला आहे. शेवटच्या टप्यातील मतदानाची माहिती उपलब्ध होण्यास विलंब होणार असल्यामुळे दुपारनंतर केंद्रावरील मतदार संख्या लक्षात घेता संध्याकाळपर्यंत ७५ ते ८० टक्के मतदान झाल्याचा आंदाज तहसीलदार राजाराम तवटे यांनी व्यक्त केला.
ग्राम पंचायतींच्या या मतदानासाठी सकाळपासून केंद्रांवर ग्रामस्थानी रांगेत उभे राहून मतदान केले. त्यामुळे जिल्हह्यात कोठेही अनुचित घटना घडली नसल्याचे सांगितले जात आहे. या मतदानाच्या कालावधीपैकी सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६५ हजार ५०७ मतदानापैकी १५.२० टक्के, तर सकाळी ११.३० वाजेपर्यंत ३७०३५ टक्के, दुपारी १.३० वाजेपर्यंत ५६.६४ टक्के आणि ३.३० वाजेपर्यंत ७१.२४ टक्के म्हणजे ४७ हजार ३७९ जणांनी मतदान केल्याचा अहवाल आहे.
यामध्ये २४ हजार ७३५ पुरूषांसह २२ हजार ६४३ महिला आणि इतर एक आदींनी मतदान केलेले आहे. या निवडणुकीसाठी ७२७ उमेवार निवडणूक रिंगणात होते. यापैकी ३५ सरपंच पदासाठी ११४ जणांसह २१९ सदस्य पदांसाठी ६१३ जणांसाठी आज तब्बल ८० टक्के मतदानाचा ५.३०वाजेपर्यंतचा आंदाज व्यक्त करण्यात आला. मतदान केंद्रांवर शांततेत मतदान झाले. कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडली नाही. यासाठी पोलिस अधिकारी, पोलिसांसह ९९० जणांचे मनुष्यबळ तैनात होते.