१४३ ग्रामपंचायतींच्या ९९६ सदस्यांसाठी ८० टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 12:08 AM2021-01-16T00:08:56+5:302021-01-16T00:09:12+5:30

ग्रामपंचायतींसाठी दोन लाख ५० हजार १६८ जणांंना मतदानाचा हक्क मिळाला होता. यात एक लाख ३१ हजार ९१६ पुरुषांसह एक लाख १८ हजार २५० महिला मतदार होते.

80% voting for 996 members of 143 Gram Panchayats | १४३ ग्रामपंचायतींच्या ९९६ सदस्यांसाठी ८० टक्के मतदान

१४३ ग्रामपंचायतींच्या ९९६ सदस्यांसाठी ८० टक्के मतदान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
ठाणे : जिल्ह्यातील १४३ ग्रामपंचायतींच्या ९९६ सदस्यांसाठी उभ्या असलेल्या दोन हजार ४१३ उमेदवारांना शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ८० टक्के मतदान झाल्याचा अंदाज तहसीलदार राजेंद्र तवटे यांनी व्यक्त केला. मतमोजणी १८ जानेवारीला प्रत्येक तालुक्याच्या निश्चितस्थळी पार पडणार आहे.
भिवंडीतील एका मतदान केंद्रावर सकाळी काही वेळेसाठी ईव्हीएम मशीन बंद पडले होते; पण ते त्वरित पूर्ववत करण्यात आले. याव्यतिरिक्त कोठेही काहीही घडले नसल्याचा दावा तवटे यांनी केला.

ग्रामपंचायतींसाठी दोन लाख ५० हजार १६८ जणांंना मतदानाचा हक्क मिळाला होता. यात एक लाख ३१ हजार ९१६ पुरुषांसह एक लाख १८ हजार २५० महिला मतदार होते. या मतदानापैकी ८० टक्के मतदान झाल्याचा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला. शेवटच्या टप्प्यातील मतदानाची आकडेवारी मिळण्यास रात्री उशिर होणार आहे; परंतु शेवटच्या दीड तासात म्हणजे ५.३० वाजेपर्यंत साडेचार ते पाच टक्क्यांच्या अंदाजासह जिल्हाभरात ८० टक्के मतदानाचा अंदाज तवटे यांनी व्यक्त केला. तत्पूर्वी, सकाळी १०.३० वा. १७ टक्के, दुपारी १.३० वाजेपर्यंत ३९ टक्के, त्यानंतरच्या टप्प्यात ५६ आणि ३.३० वाजता ७१ टक्के मतदान झाल्याची नोंद प्रशासनाने केली आहे.

तालुकानिहाय मतदान
तालुका    ग्रा.पं.    मतदान    टक्केवारी
मुरबाड    ३९    २३०४२    ७०.७२
अंबरनाथ    २६    २७,७७१    ७४.७६
भिवंडी    ५३    ८९,८५५    ७५.४४
कल्याण    २०    ३२,०८३    ६०.६०
शहापूर    ५    ५८६२    ६७.००

पाच ग्रामपंचायतींसाठी एकही उमेदवारी आली नाही
ठाणे : एकही उमेदवारी अर्ज न आलेल्या ठाणे तालुक्यातील पाच ग्रामपंचायती वगळता जिल्ह्यातील या १५८ ग्रामपंचायतींच्या एक हजार ४७२ सदस्यांसाठी निवडणुका हाती घेतल्या होत्या. त्यासाठी चार हजार ३८८ जणांनी उमेदवारी दाखल केली होती. यापैकी आठ ग्रामपंचायतींसह ४१८ सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. उर्वरित ९९६ सदस्यांच्या १४३ ग्रामपंचायतींच्या निवडणूक रिंगणातील दोन हजार ४१३ उमेदवारांचे नशीब मतदारांनी ईव्हीएम मशीनमध्ये बंद केले आहे. जिल्ह्यातील या आजच्या मतदानासाठी निश्चित केलेल्या ४७९ मतदान केंद्रांवर तब्बल दोन हजार ९०० अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी तैनात होते.

Web Title: 80% voting for 996 members of 143 Gram Panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.