गणेशोत्सवासाठी ८०१ एसटी हाऊसफुल्ल, ग्रुप बुकिंगकडे चाकरमान्यांचा कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 06:27 AM2017-08-09T06:27:12+5:302017-08-09T06:27:15+5:30
गणेशोत्सव म्हणजे चाकरमान्यांसाठी जणू एक पर्वणीच असते. कोकणात बाप्पाच्या स्वागतासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
पंकज रोडेकर
ठाणे : गणेशोत्सव म्हणजे चाकरमान्यांसाठी जणू एक पर्वणीच असते. कोकणात बाप्पाच्या स्वागतासाठी जाणाºया चाकरमान्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हीच बाब लक्षात यावर्षी महाराष्टÑ परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागाने ८६० बस सोडण्याचे नियोजन केले आहे. त्यापैकी ८०१ बसेस आजघडीला हाऊसफुल्ल झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक २६६ बस या बोरीवली डेपोतील आहेत.तर नियोजित बसपैकी ४१२ बस या ग्रुप बुकिंग व उर्वरित आॅनलाईन पद्धतीने फु ल्ल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
गणेश चतुर्थी येत्या २५ आॅगस्ट रोजी असल्याने त्यानिमित्त कोकणात जाणाºया गणेश भक्तांची जोरदार तयारी सुरू झाली आहे. याकरीता एसटीच्या ठाणे विभागामार्फत गतवर्षापेक्षा यंदाही योग्यरित्या ८६० बस सोडण्याचे नियोजन केले आहे. मात्र, तरीसुद्धा आणखी जादा बस सोडण्याची तयारी करून ठेवल्याचे विभागाकडून सांगण्यात आले. ठाणे विभागातील ७ डेपोतून २० ते २४ आॅगस्टदरम्यान या जादा फेºया सोडण्यात येणार आहेत.
या जादा गाड्यांचे आरक्षण संगणकीय आरक्षण एक महिना अगोदरपासून उपलब्ध करून दिले आहे. तसेच ग्रुप पद्धतीचे आरक्षण ४० दिवस आधी सुरू झाले असून त्यासाठी आगार व्यवस्थापकांकडे संपर्क साधण्याचे आवाहन केले होते. त्याचबरोबर परतीचे आरक्षणही तत्काळ उपलब्ध करून दिले असून परतीचा प्रवास हा ३१ आॅगस्ट ते ०५ सप्टेंबर दरम्यान होणार असल्याची माहिती विभागाने दिली. कल्याण-डोंबिवलीतूनही जादा बस बुक झाल्या असून विठ्ठलवाडी आगारालाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
२४ आॅगस्ट सुटणाºया 125बस कोकणात जाण्यासाठी २० ते २४ आगस्ट असे पाच दिवस जादा बस सोडण्यात येणार आहेत.
यामध्ये २० आॅगस्टला रविवार असून अवघ्या दोन जादा बस सुटणार आहेत.
तर २१आॅगस्टला १५, २२ रोजी ११८, २३ आॅगस्ट या दिवशी ५४ तर २४ आॅगस्ट रोजी सध्यातरी बुकींगपैकी १२५ सर्वाधिक बस सोडण्यात येणार आहेत.
बुकिंगमध्ये रत्नागिरीकर आघाडीवर
बाप्पांच्या आगमनासाठी बुकींग झालेल्या ८०१ गाड्यांमध्ये सर्वाधिक बुकिंग करणाºयांमध्ये रत्नागिरीकर आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ दापोली, गुहागर, चिपळूण, खेड येथील चाकरमानी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
३९ ग्रुपद्वारेच ४१२ बसेस फुल्ल
चाकरमान्यांचा ग्रुप बुकींग करण्याकडे जास्त कळ असल्याचे दिसून येते. यामध्ये ३९ ग्रुपने ४१२ बस बुकींग केल्या आहेत.