ठाणे जिल्हा परिषदेचे ८१ अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त

By सुरेश लोखंडे | Published: June 2, 2024 07:12 PM2024-06-02T19:12:54+5:302024-06-02T19:13:14+5:30

१ जून राेजी जिल्हा परिषदेचे एकूण ८१ अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याची नाेंद करण्यात आली आहे.

81 officers and employees of Thane Zilla Parishad retired | ठाणे जिल्हा परिषदेचे ८१ अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त

ठाणे जिल्हा परिषदेचे ८१ अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त

ठाणे : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अभियान अंतर्गत प्रत्येक महिन्यात आनंददायी निवृत्ती वेतन योजना राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने आज सेवानिवृत्त होत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा पार पडला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक छाया शिसोदे यांच्या शुभहस्ते ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील उप अभियंता (यांत्रिकी) हणमंत आकाराम कदम, आरोग्य विभागातील आरोग्य सहाय्यक ज्ञानेश्वर पंडित थटार यांचा सन्मान करण्यात आला. यानुसार १ जून राेजी जिल्हा परिषदेचे एकूण ८१ अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याची नाेंद करण्यात आली आहे. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रुपाली सातपुते, ग्रामपंचायत विभाग प्रमुख उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, पाणी पुरवठा विभाग प्रमुख प्रदिप कुलकर्णी तसेच सर्व जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सेवानिवृत्त झालेल्यांमध्ये प्राथमिक शिक्षण विभागाचे ४६, सामान्य प्रशासनचे १०, महिला व बालकल्याणचे एक, ग्रामपंचायत विभागातील चार, आरोग्य विभागाचे आठ, बांधकाम विभागामधील ११, पशुसंवर्धनमधील एक आदी एकूण ८१ अधिकारी व कर्मचारी आज सेवानिवृत्त झाले आहेत. उपअभियंता (यांत्रिकी), विस्तार अधिकारी शिक्षण, मुख्याध्यापक, प्राथमिक शिक्षक, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यीका, ग्रामसेवक, शिपाई, सफाई कामगार या पदावरील अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहे.
 

Web Title: 81 officers and employees of Thane Zilla Parishad retired

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.