राष्ट्रीय महामार्गावर ८१ बळी, दोन वर्षांचा चढता आलेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 12:27 AM2018-10-26T00:27:01+5:302018-10-26T00:27:04+5:30

कल्याण-नगर राष्ट्रीय महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढते आहे.

81 victims on national highway, two years old article | राष्ट्रीय महामार्गावर ८१ बळी, दोन वर्षांचा चढता आलेख

राष्ट्रीय महामार्गावर ८१ बळी, दोन वर्षांचा चढता आलेख

Next

मुरबाड : कल्याण-नगर राष्ट्रीय महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढते आहे. दोन वर्षांत या रस्त्यावर विविध अपघातांत ८१ जणांचा बळी गेला असून १३० जण गंभीर जखमी झाले. दिवसेंदिवस या मार्गावरील अपघातांचा चढता आलेख पाहता राष्ट्रीय महामार्ग विभागाला अपघातमुक्त रस्ता करण्यास अपयश आल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
कल्याण-नगर हा मार्ग दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याने तसेच राज्याच्या मध्यभागातून जात असल्याने तो राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला. मात्र, या रस्त्याचे चौपदरीकरण करण्याआधीच येथून जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढली. या वाढीव वाहनांचे नियंत्रण करण्यास राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग तसेच राष्ट्रीय महामार्ग पोलीस खाते अपयशी ठरल्याने अपघाताचे प्रमाण वाढत असल्याचे नागरिक सांगतात.
दरवर्षी रस्त्याचे नूतनीकरण करण्यापासून ते डागडुजी करणे, दिशादर्शक बसवणे, खड्डे भरणे, कॅटाइन बसवणे यावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत असतात. मात्र, जागोजागी पोलीस चौक्या उभारूनही वेगमर्यादा तसेच भारमान मर्यादेवर नियंत्रण नसल्याने दररोज अपघातात बळी जातात. गेल्या अडीच वर्षांत मुरबाड उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मोरे यांच्या कार्यालयातून माहिती मागितली असता त्यांनी टोकावडे तसेच मुरबाड पोलीस ठाण्यातून ही माहिती उपलब्ध करून दिली.
याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाला विचारणा केली असता अपघात रोखणे, ही पोलीस खात्याची जबाबदारी असल्याचे मत या विभागाचे उपअभियंता सुनील पाटील यांनी व्यक्त केले.
>दोन वर्षांतील अपघातांची आकडेवारी
२०१६ मध्ये टोकावडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४३ जणांना जीव गमवावा लागला असून यात महिलांची संख्या १०, तर ३३ पुरुष आहेत. किरकोळ व गंभीर जखमींची संख्या ७८ असून पुरु ष ५७, तर महिला २१ आहेत. मुरबाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत २०१६ मध्ये एकूण ५२ अपघात घडले असून त्यात १५ पुरु ष आणि एक महिला ठार झाली. गंभीर जखमींमध्ये १९ पुरु ष आणि एक महिलेचा समावेश आहे. किरकोळ जखमींमध्ये २७ पुरुष आणि पाच महिला.
२०१७ मध्ये ४८ अपघातांत १३ पुरुष आणि एक महिला दगावली. १० अपघातांत १९ पुरुष आणि चार महिला या गंभीर जखमी झाल्या. किरकोळ अपघात १५ झाले असून २० पुरु ष व एक महिला जखमी झालेली आहे . सन २०१८ च्या जून महिन्यापर्यंत १३ अपघात झाले असून सात पुरुष व एक स्त्रीला जीव गमवावा लागला आहे. चार अपघातांत नऊ पुरु ष गंभीर जखमी झाले आहेत. दोन किरकोळ अपघातांत चार पुरु ष व एक महिला जखमी झाली असल्याची माहिती मुरबाड पोलीस ठाण्यातून उपलब्ध झालेली आहे.
कल्याण-नगर, म्हारळ ते माळशेज घाट असा ९४ किमीचा राष्टÑीय महामार्ग आमच्या हद्दीत येतो. येथे दिवसेंदिवस अपघात वाढत आहेत. यासाठी प्रथम वाहनचालक आणि जनता यांच्यात प्रबोधन करण्यात येईल. जे चालक वेगमर्यादा तसेच भारमानाची मर्यादा ओलांडतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. आमच्याकडे कर्मचारी संख्या कमी आहे. कालच उमरोली पोलीस चौकीवर नवीन पीएसआय हजर झाले आहेत. त्यांना सूचना करण्यात आली आहे. येथे अपघातमुक्त प्रवास होण्यालाच प्राधान्य असेल. - श्रीकांत मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी, राष्टÑीय महामार्ग विभाग, ठाणे

Web Title: 81 victims on national highway, two years old article

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.