केडीएमसी हद्दीत कोरोनाचे नवे ८२५ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:42 AM2021-03-27T04:42:07+5:302021-03-27T04:42:07+5:30
कल्याण : कल्याण-डोंबिवलीत शुक्रवारी कोरोनाचे नवीन ८२५ रुग्ण आढळून आले आहेत. तर तीन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मागील ...
कल्याण : कल्याण-डोंबिवलीत शुक्रवारी कोरोनाचे नवीन ८२५ रुग्ण आढळून आले आहेत. तर तीन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मागील २४ तासांत ३९२ रुग्ण उपचाराअंती बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. सध्या एकूण सात हजार १०१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मनपा हद्दीतील आजवरचा बाधितांची संख्या ७४ हजार ६६४ वर पोहोचला आहे. यातील ६६ हजार ३२३ रुग्ण उपचाराअंती बरे होऊन घरी परतले आहेत. तर एक हजार २४० रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. डोंबिवली पूर्वेतील सर्वाधिक २८६, कल्याण पश्चिमेत २५५, डोंबिवली पश्चिमेत ८७ तर कल्याण पूर्वेत १३६ नवे रुग्ण सापडले आहेत. मांडा-टिटवाळा परिसरात २६ रुग्ण आढळून आले आहेत. मोहना आणि पिसवली भागात अनुक्रमे २९ आणि सहा असे एकूण ८२५ नवे रुग्ण आढळून आले आहेत.
--------------------------------
डिपार्टमेंटल स्टोअर्स सील
कल्याण पश्चिमेत डी-मार्टमधील कर्मचाऱ्यांना गेल्या आठवड्यात कोरोनाची लागण झाल्याने ते सील करण्यात आले होते. दरम्यान शुक्रवारी केडीएमसीच्या ‘अ’ प्रभाग क्षेत्रांतर्गत शहाड रेल्वे स्थानकाजवळील पटेल आर मार्ट या डिपार्टमेंटल स्टोअर्समधील काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने त्याला सील ठोकण्यात आल्याची माहिती ‘अ’ प्रभागक्षेत्र अधिकारी राजेश सावंत यांनी दिली. या स्टोअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर खरेदीसाठी गर्दी होते, खबरदारीचा उपाय म्हणून ही कार्यवाही केल्याचे सावंत यांनी सांगितले.
--------------------------------------