‘बारवी’त ८३ टक्के, तर ‘आंध्रा’त ५९ टक्के पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 12:11 AM2020-08-22T00:11:02+5:302020-08-22T00:11:14+5:30

या धरणात गेल्या वर्षी या दिवशी १०० टक्के पाणीसाठा होता. शुक्रवारी या धरणात १९ मि.मी. पाऊस पडला तर, बारवी धरणात शुक्रवारी ८३ टक्के पाणी जमा झाले.

83 per cent water in Barvi and 59 per cent water in Andhra | ‘बारवी’त ८३ टक्के, तर ‘आंध्रा’त ५९ टक्के पाणी

‘बारवी’त ८३ टक्के, तर ‘आंध्रा’त ५९ टक्के पाणी

Next

ठाणे : जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदर आणि ठाणे शहराच्या काही भागासह ग्रामीण क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या उल्हास नदीवरील आंध्रा धरणात शुक्रवारी पावसाचा जोर कमी आहे. या धरणात सध्या ५९ टक्के पाणीसाठा आहे. या धरणात गेल्या वर्षी या दिवशी १०० टक्के पाणीसाठा होता. शुक्रवारी या धरणात १९ मि.मी. पाऊस पडला तर, बारवी धरणात शुक्रवारी ८३ टक्के पाणी जमा झाले.
उल्हास नदीवरील शहाडजवळील मोहने बंधारा येथून स्टेम प्राधिकरणाद्वारे मनपा, भिवंडीच्या परिसराला पाणीपुरवठा केला जातो. उल्हास नदीला कर्जतजवळ भीवपुरी येथील टाटाच्या मालकीच्या या आंध्रा धरणातून पाणी सोडले जाते. यंदा अजून केवळ ५९ टक्के पाणीसाठा झाला आहे. उल्हास नदीच्या परिसरात पावसाचा जोर वाढल्यानंतर आंध्रात धरणात पाणीसाठा तयार होईल. आजमितीस २०२ दशलक्ष घनमीटर एवढाच पाणीसाठा आहे. बारवी धरण भरून वाहण्याकरिता त्यामध्ये अवघा १.९५ मीटर साठा होणे बाकी आहे.
बारवी धरणात पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास ते लवकरच भरण्याचे चिन्हे दिसत आहे. शुक्रवारी या धरण परिसरात सरासरी ८६ मि.मी. पाऊस पडला. मोडकसागर १०० टक्के तर तानसा ९९.५८ टक्के भरले आहे. याशिवाय सर्वात मोठे भातसा धरण ९२.६९ टक्के भरले आहे. या धरणात शुक्रवारी ७२ मि.मी. पाऊस झाला.
जिल्ह्यात गुरुवारी रात्रीपासून शहरी भागात सरासरी ४८.६ मि.मी. पाऊस झाला. ठाण्यात १७.४ मि.मी., कल्याणमध्ये ६८ मि.मी., मुरबाड ४९ मि.मी., भिवंडी ३८.६ मि.मी., शहापूर ६८.६ मि.मी. पाऊस झाला आहे.

Web Title: 83 per cent water in Barvi and 59 per cent water in Andhra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.