ज्येष्ठ नागरिकांना लुटणारा चोरटा अवघा ८३ वर्षांचा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 03:01 AM2017-10-02T03:01:00+5:302017-10-02T03:01:22+5:30
वयाची साठी ओलांडलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा विश्वास संपादन करुन त्यांना आपल्या सोबत मुंब्रा येथे येण्यास भाग पाडून त्यांच्या अंगावरील सोन्याची चेन तसेच अंगठी काढून घेणारा अवघा ८३ वर्षीय चोरटा विजय अधिकारी याला पोलिसांनी अटक केली आहे
पंकज रोडेकर
ठाणे : वयाची साठी ओलांडलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा विश्वास संपादन करुन त्यांना आपल्या सोबत मुंब्रा येथे येण्यास भाग पाडून त्यांच्या अंगावरील सोन्याची चेन तसेच अंगठी काढून घेणारा अवघा ८३ वर्षीय चोरटा विजय अधिकारी याला पोलिसांनी अटक केली आहे. ज्येष्ठ नागरिकांना लुबाडण्यासाठी हीच पद्धत तो १९९३ साली मुंबईत राबवत होता. त्यावेळी मुंबईत पोलीस दलात काम केलेल्या अधिकाºयांना चोरट्याची ही कार्यपद्धती परिचित वाटली आणि त्याचा माग काढत ते त्याच्यापर्यंत पोहोचले.
अधिकारी याच्या हाताला वयोमानानुसार कंप सुटत असतानाही, आतापर्यंत तो पोलिसांना गुंगारा देत होता. वयाची ऐंशी वर्षे उलटून गेल्यावरही गुन्हेगारीचा मार्ग न सोडणाºया या शार्विलकावर तुरुंगाची हवा खाण्याची पाळी ओढवली आहे.
ठाणे बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना व विशेष करुन गळ्यात चेन आणि हातात अंगठ्या असलेल्यांना अधिकारी
हेरत असे. अधिकारी याचे वय पाहून समोरील व्यक्ती आदराने वागवत. नेमका त्याचाच फायदा उचलत तो त्यांना लुटत होता. कधी माझे दुकान पाहण्यासाठी चला, असा बहाण तो करीत असे किंवा कधी ठाण्यातील कौपीनेश्वर मंदिरात मला ५० हजार रुपये दान करायचे आहेत. माझ्यासोबत तुम्हीही येऊन माझ्या पुण्यकार्यात सहकार्य करा, असे सांगून अधिकारी त्या व्यक्तीला रिक्षातून मुंब्रा रेल्वे स्थानक परिसरात नेत असे. तेथील एका दुकानदाराशी ओळख असल्याचे भासवून त्यांना आत नेत असे व भीती घालून त्यांच्या अंगावरील दागिने काढून घेत असे.
जुलै-आॅगस्ट महिन्यांमध्ये
प्रत्येकी एक तक्रार दाखल
झाली होती. े ज्येष्ठ नागरिकांना लुटण्याची ही पद्धत परिचयाची असल्याचे ठाणेनगर पोलीस
ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
मंदार धर्माधिकारी यांच्या लक्षात आली. मुंबईतील नागपाडा पोलीस ठाण्यात असताना, अशा घटना उघडकीस आल्याचे त्यांना स्मरण झाले.
त्यावेळी एकाला अटक करून त्याच्याकडून नागपाडा, टीबी मार्ग, आग्रीपाडा, गावदेवी, व्ही टी रोड या पाच पोलीस ठाण्यातील २१ गुन्हे उघडकीस आणले होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक अभय सायंगावकर हे कुर्ला पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक असताना, कुर्ला पोलिसांनी अशाच गुन्ह्यांत अटक केली होती, याचे त्यांना स्मरण झाले. लागलीच ठाणेनगर पोलिसांनी चक्रे फिरवून आरोपीबाबत माहिती गोळा करण्यास सुरूवात केली.
मुंबई पोलिसांकडून अधिकारी याची माहिती मिळाली. त्याची खातरजमा केल्यावर टिटवाळ््यातून मुसक्या आवळल्या. तक्रारदारांनी त्याला ओळखल्याने ठाण्यातील दोन्ही गुन्हे उघडकीस आणण्यात तपास अधिकारी तथा सहायक पोलीस निरीक्षक जे.एम. पाटील यांच्या पथकाला यश आले आहे.