कोरोनाचे नवे ८५ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:27 AM2021-07-02T04:27:45+5:302021-07-02T04:27:45+5:30

----------------------------------------- दुचाकी चोरीला कल्याण : उल्हासनगरमध्ये राहणारे गणेश राऊत हे कामानिमित्त कल्याणमध्ये दुचाकीवरून आले होते. त्यांनी त्यांची गाडी पुणे ...

85 new corona patients | कोरोनाचे नवे ८५ रुग्ण

कोरोनाचे नवे ८५ रुग्ण

Next

-----------------------------------------

दुचाकी चोरीला

कल्याण : उल्हासनगरमध्ये राहणारे गणेश राऊत हे कामानिमित्त कल्याणमध्ये दुचाकीवरून आले होते. त्यांनी त्यांची गाडी पुणे लिंक रोडवरील राज पॅलेस हॉटेलसमोर पार्क केली होती. तेथून ती गाडी चोरीला गेल्याची घटना १३ जूनच्या मध्यरात्री घडली. दरम्यान, याप्रकरणी नुकताच कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला गेला आहे.

-------------------------------------------

सोन्याचे दागिने लंपास

डोंबिवली : पूर्वेतील डॉ. आर. पी. रोडवरील मोरेश्वर सोसायटीत राहणारे भावेश मादरेचा यांच्या राहत्या घराचे लॅच तोडून चोरट्यांनी घरातील ५६ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना बुधवारी सकाळी ९ ते दुपारी ३.३० या कालावधीत घडली. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

----------------------------------------------

नारळ फेकून मारला

डोंबिवली : हातातील केक खात असताना केकचा रिकामा बॉक्स रस्त्यावर फेकल्याप्रकरणी विचारणा केली असता एका २६ वर्षीय तरुणाने रागाच्या भरात नारळ विक्रेता हेमंत गड्डा यांच्या डोक्यात नारळ फेकून मारल्याची घटना बुधवारी मानपाडा रोडवरील गावदेवी मंदिराजवळ संध्याकाळी ५ वाजता घडली. याप्रकरणी गड्डा यांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे.

-------------------------------------------------

Web Title: 85 new corona patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.