भिवंडी लोकसभा मतदारसंघात ८५ टक्के उमेदवारांचे डिपॉझिट होते जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 01:32 AM2019-04-25T01:32:33+5:302019-04-25T01:32:50+5:30

भिवंडी लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून झालेल्या दोन निवडणुकांमध्ये राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांबरोबर अनेक अपक्षांनी निवडणूक लढवली.

85 percent of the deposits of Bhiwandi Lok Sabha constituency were seized | भिवंडी लोकसभा मतदारसंघात ८५ टक्के उमेदवारांचे डिपॉझिट होते जप्त

भिवंडी लोकसभा मतदारसंघात ८५ टक्के उमेदवारांचे डिपॉझिट होते जप्त

Next

भिवंडी : भिवंडी लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून झालेल्या दोन निवडणुकांमध्ये राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांबरोबर अनेक अपक्षांनी निवडणूक लढवली. अपक्षांमधील काही उमेदवार आपल्या परिसरातील मते खाण्यासाठी पुढे आलेले दिसून येतात, तर काही पक्ष आपण कोणत्या स्थानी आहोत, याची पडताळणी मतांमधून करतात. अपक्षांना एकूण मतांच्या १६ टक्केही मते मिळत नसल्याने त्यांचे डिपॉझिट जप्त होते. मात्र, त्यांच्यामुळे मतांचे विभाजन होत असल्याचे पाहायला मिळते.

२००९ मध्ये झालेल्या पुनर्रचनेनंतर भिवंडी मतदारसंघ अस्तित्वात आला. त्यानंतर, लोकसभेच्या दोन निवडणुका झाल्या आहेत. पहिल्या २००९ च्या निवडणुकीत एकूण १६ उमेदवार उभे होते. त्यावेळी एकूण मतदान पाच लाख ८४ हजार २६३ झाले. त्यानुसार, अपेक्षित मते न मिळाल्याने १३ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. म्हणजेच, ८१ टक्के जणांचे डिपॉझिट जप्त झाले. २०१४ मध्ये झालेल्या दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत एकूण १३ जण रिंगणात होते. त्यावेळी एकूण आठ लाख ७५ हजार ६०५ मतदान झाले. त्यापैकी अपेक्षित मतदान न झाल्याने ११ उमेदवारांचे म्हणजेच ८४ टक्के उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. असे असतानाही २०१९ मध्ये होणाºया या निवडणुकीत उमेदवारांची संख्या १५ झाली आहे.

डिपॉझिट जप्त होऊ नये म्हणून किती लागतात मते?
एखाद्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होणार की नाही, हे त्याला मिळालेली मते व वैध मते यांच्या प्रमाणावर अवलंबून असते. कोणत्याही उमेदवाराला एकूण वैध मतांच्या किमान १६ टक्के मते मिळवावी लागतात. तेवढी मते मिळाली नाही, तर त्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होते.

85% टक्के उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होत असल्याची आतापर्यंतची सरासरी आहे.

Web Title: 85 percent of the deposits of Bhiwandi Lok Sabha constituency were seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.