गणेशोत्सवासाठी भक्तांकडून ८५० एसटी बुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 03:08 AM2018-09-09T03:08:25+5:302018-09-09T03:08:51+5:30

गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी सुमारे ८५० बस बुक झालेल्या आहेत.

850 ST Books from devotees for Ganeshotsav | गणेशोत्सवासाठी भक्तांकडून ८५० एसटी बुक

गणेशोत्सवासाठी भक्तांकडून ८५० एसटी बुक

Next

ठाणे : गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी सुमारे ८५० बस बुक झालेल्या आहेत. त्या ठाण्यासह भिवंडी, कल्याण, विठ्ठलवाडी, भांडुप, मीरा-भार्इंदर आदी ठिकाणांहून सुटणार असल्याचे एसटी महामंडळ अधिकाऱ्यांनी आढावा बैठकीत यावेळी सांगितले.
यात ठाण्यातून सुमारे ५५० गाड्या सुटणार आहेत. यातील सुमारे २०० बस कॅडबरीनाक्यापासून ते तीनहातनाका, माजिवडा या परिसरातील सर्व्हिस रोडवर उभ्या करण्याची परवानगी यावेळी एसटीला देण्यात आली. मात्र, या गाड्या ज्या ठिकाणी उभ्या करणार, तेथूनच प्रवासी घेऊन शहराबाहेर पडण्याचे नियोजन पोलिसांकडून करण्यात येणार आहे. दुपारी ३ वाजेपासून, तर रात्री १० वाजेपर्यंत या बसेस ठिकठिकाणी धावणार आहेत. यादरम्यान शहरात वाहतूककोंडी होणार नाही, याची काळजी घेण्यासाठी पोलीस यंत्रणा तैनात केली. याशिवाय, महापालिकांना वाहतूक वॉर्डन पुरवण्याचे आदेशही पालकमंत्र्यांनी या बैठकीत दिले.
गणेशोत्सव आणि मोहरम एकत्र येत आहे. यासाठी ठिकठिकाणी शांतता समित्या गठीत केल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीसमित्रांचेही नियोजन केले. तर, गणेश मंडळांच्या व्यवस्थापन समित्यांची बैठक घेऊन त्यांना नियमांचे पालन करण्यासाठी मार्गदर्शन केले.
ठाणेप्रमाणेच नवी मुंबई पोलिसांनीदेखील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठीचे नियोजन स्पष्ट केले. कोकणात जाणाºया रस्त्यांवर ठिकठिकाणी पोलीस तैनात केल्याचे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून सांगण्यात आले. सणासुदीच्या या कालावधीत मिठाईचा मोठ्या प्रमाणात वापर होणार आहे. यातून कोणत्याही प्रकारची विषबाधा होणार नाही, यासाठी काळजी घेण्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले. मिठाईच्या दुकानदारांकडून भेसळ होणार नाही, यासाठी सतर्क राहून संभाव्य विषबाधा टाळण्याचे जिल्हाधिकाºयांनी संबंधितांना बजावले.
कालावधीत यावेळी प्रादेशिक परिवहन विभागाच्या नियोजनासह राष्टÑीय महामार्ग, एमएसआरडीसी, रेल्वे, बांधकाम, परिवहन आदी विभागांनी यावेळी गणेशोत्सवासाठीचे नियोजन स्पष्ट केले. हे नियोजन करण्यामागे गणेशभक्तांना कमीत कमी त्रास व्हावा, असा उद्देश आहे. तसेच अनेक गाड्यांची देखील सोय केली आहे.
>साडेतीन हजार पोलिसांचा बंदोबस्त
पोलीस आयुक्त विवेक फणसळकर म्हणाले की, पाचही परिमंडळांत पोलिसांची तयारी पूर्ण झाली आहे.
पोलीस उपायुक्त वाहतूक अमित काळे यांनीदेखील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नियोजन केल्याचे सांगितले. ग्रामीण पोलीस हद्दीत १०४० सार्वजनिक आणि ४० हजारांपेक्षा जास्त खासगी गणपती बसवण्यात येतात, अशी माहितीही यावेळी दिली.
>महापालिकांचे नियोजन
भिवंडी : १० विसर्जन घाट असून राजीव गांधी उड्डाणपुलाच्या दुरु स्तीचे काम १२ ते १५ दिवसांत पूर्ण होईल. व्हीजेटीआयच्या मार्गदर्शनाने आणि देखरेखीखाली हे काम सुरू आहे.
कल्याण-डोंबिवली : २१६ मंडळांना परवानग्या दिल्या आहेत. ६८ ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था. उल्हासनगर भागातील काही मोठे गणपती कल्याण येथे विसर्जनासाठी येतात, त्यामुळे थोडी समस्या उद्भवते.
उल्हासनगर : ६० टक्के रस्ते सिमेंटचे आहेत. तितकीशी खड्ड्यांची समस्या नसल्याचा दावा. पण, जिथे आहेत, ते डांबराने बुजवत आहेत. आॅनलाइन ५४५ अर्ज आले असून १९२ मंडळांना परवानगी दिली आहे. ११ सप्टेंबरला पोलीस आयुक्त उल्हासनगरात मंडळांची बैठक घेतील.
नवी मुंबई : २०२ मंडळांना परवानगी दिली असून २३ विसर्जन तलाव, ६७० स्वयंसेवक तैनात आहेत.
ठाणे : ३६ विसर्जन तलाव असून आॅनलाइन ३०९ अर्ज आले आहेत.
मीरा-भार्इंदर : २१ विसर्जन तलाव असून एक मोठा कृत्रिम तलावही आहे. ७० जीवरक्षक तैनात, ३५ बोटी भाड्याने घेतल्या. २५ लाकडी तराफे तयार ठेवले आहेत. पाच रु ग्णवाहिकांची सोय आहे.

Web Title: 850 ST Books from devotees for Ganeshotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.