ठाण्यात ८६ टक्के नालेसफाई पूर्ण
By admin | Published: June 2, 2017 05:30 AM2017-06-02T05:30:44+5:302017-06-02T05:30:44+5:30
दरवर्षी ठाणे महापालिकेच्या वतीने नालेसफाई करण्यात येत असली, तरी पावसाळ्यात पाणी तुंबण्याच्या घटना घडत असतात. यंदा
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : दरवर्षी ठाणे महापालिकेच्या वतीने नालेसफाई करण्यात येत असली, तरी पावसाळ्यात पाणी तुंबण्याच्या घटना घडत असतात. यंदा मात्र नालेसफाईची पालिकेने जोरदार मोहीम हाती घेतली असून आतापर्यंत ८६ टक्के नालेसफाईचा दावा केला आहे. तसेच, येत्या ७ जूनपर्यंत १०० टक्के नालेसफाई होईल, असेदेखील स्पष्ट केले आहे.
मुंबईप्रमाणे ठाण्यातही ठिकठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना घडतात. याला कारण म्हणजे पावसाळ्यापूर्वी न झालेली नालेसफाई. ठाणे शहरात जवळपास १३४ किलोमीटरचे नाले आहेत. मग, त्यात छोटेमोठे दोन्ही नाल्यांचा समावेश आहे, तर या सर्व नाल्यांचे ६५ विभागांमध्ये वर्गीकरण केले आहे. या नाल्यांची सफाई झाली की नाही, हे पाहण्यासाठी खास ६५ अधिकाऱ्यांची नेमणूकदेखील प्रशासनाने केली आहे. या अधिकाऱ्यांच्या आतापर्यंत पाहणीच्या चार फेऱ्या झाल्या आहेत. नालेसफाई झाल्यानंतरही पावसाळ्यात पालिका या नाल्यांवर वॉच तर ठेवणारच आहे. परंतु, कोणत्या ठिकाणी पाणी साचत आहे, याकडेही लक्ष द्यदेणार असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले.