९२ प्रस्तावांत वृक्षांची कत्तल होणार
By admin | Published: December 12, 2015 02:30 AM2015-12-12T02:30:44+5:302015-12-12T02:30:44+5:30
ठाण्याला स्मार्ट सिटी करण्याचा दावा करताना ठाणे महापालिका आयुक्त हे शहर हरित ठाणे कसे आहे
ठाणे : ठाण्याला स्मार्ट सिटी करण्याचा दावा करताना ठाणे महापालिका आयुक्त हे शहर
हरित ठाणे कसे आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु दुसरीकडे हीच महापालिका ठाण्यातील वृक्षतोडीला परवानगी देत आहे. येत्या वृक्षप्राधिकरणाच्या बैठकीत २ हजार ४९२ वृक्षांच्या कत्तलीचे ९२ प्रस्ताव पटलावर ठेवले आहेत. यामध्ये विकासकांच्या हितासाठी १ हजार १६४ वृक्षांचा बळी जाणार आहे.
ठाणे महापालिका शहरातील वृक्ष संपदा वाढविण्यासाठी दोन वर्षांत ५ लाख वृक्षांची लागवड होणार आहे. त्यानुसार पहिल्या वर्षातील कामही सुरू झाले आहे. ठाण्याला वनसंपदा उत्तम लाभल्याचा दावा पालिका करते. परंतु वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत याच पालिकेने वृक्षतोडीचे हे ९२ प्रस्ताव पटलावर ठेवले आहेत. यामध्ये विकासकांच्या बांधकामात आड येत असलेल्या १ हजार १६४ वृक्षतोडीला परवानगी दिली जाणार आहे. तसेच रस्ता रुंदीकरण, नाला रुंदीकरण, मनपा व इतर शासकीय विकास कामात अडथळा ठरत असलेल्या १ हजार २८८ वृक्षांचीही कत्तल केली जाणार आहे. याशिवाय केवळ ४० वृक्ष हे धोकादायक ठरले असून, ते देखील पाडले जाणार आहेत.