ठाणे-पालघर जिल्ह्यांत ९४५७ कुपोषित

By Admin | Published: November 28, 2015 10:33 PM2015-11-28T22:33:19+5:302015-11-28T22:33:19+5:30

ठाणे-पालघर जिल्ह्यांत नऊ हजार ४५७ बालके अतिकुपोषित आहेत. यापैकी सर्वाधिक बालके जव्हारसह (पालघर) शहापूर (ठाणे) येथे असून १०० टक्के महापालिकेचे कार्यक्षेत्र

9 457 malnutrition in Thane-Palghar districts | ठाणे-पालघर जिल्ह्यांत ९४५७ कुपोषित

ठाणे-पालघर जिल्ह्यांत ९४५७ कुपोषित

googlenewsNext

- सुरेश लोखंडे,  ठाणे
ठाणे-पालघर जिल्ह्यांत नऊ हजार ४५७ बालके अतिकुपोषित आहेत. यापैकी सर्वाधिक बालके जव्हारसह (पालघर) शहापूर (ठाणे) येथे असून १०० टक्के महापालिकेचे कार्यक्षेत्र असलेल्या ठाणे तालुक्यातही तीव्र कुपोषित बालके आढळली आहेत.
देशाच्या आर्थिक राजधानीला लागून असलेले हे कुपोषण कधीच संपणे अपेक्षित होते. परंतु, त्यासाठी दरवर्षी शेकडो कोटी खर्च होऊनही कुपोषणाचा आलेख अल्पसा कमी झाला. पण, मेळघाटानंतर येथील कुपोषणाचाच नंबर लागतो.
अल्पवयीन मातांच्या पोटी जन्माला आल्याने ही बालके कुपोषित असल्याचे कारण सांगून प्रशासन आपला बचाव करीत आहे. सर्वसाधारण बालके, मध्यम कमी वजनाची बालके, तीव्र कमी वजनाची बालके या तीन टप्प्यांत बालकांची वर्गवारी करून ‘कुपोषण’ शब्दाची तीव्रता कागदोपत्री कमी करण्याचे काम मात्र यंत्रणेने केले आहे.
ठाणे जिल्ह्यातील ५ वर्षांपर्यंतच्या एक लाख २९ हजार ६८८ बालकांपैकी एक लाख २९ हजार १९४ बालकांचे वजन केले. त्यात एक हजार ७२६ बालके तीव्र कमी वजनाची म्हणजे कुपोषित आढळली. सर्वसाधारण श्रेणीतील एक लाख सहा हजार ७९३, तर मध्यम कमी वजनाची नऊ हजार ४३८ बालके सर्वेक्षणाअंती उघड झाली.
यातील सर्वाधिक बालके शहापूर तालुक्यासह डोळखांब आणि भिवंडी तालुक्यातील आहेत.
पालघर जिल्ह्यात दोन लाख १० हजार ७७६ बालकांपैकी दोन लाख दोन हजार ४०३ बालकांचे वजन घेतले असता त्यातून सात हजार ७३१ बालके तीव्र कमी वजनाची आढळली आहेत. उर्वरित सर्वसाधारणमध्ये एक लाख ५६ हजार ३१ तर मध्यम कमी वजनाची ३८ हजार ६४१ बालके महिला बाल कल्याण विभागाच्या सर्वेक्षणाअंती प्राप्त झाली आहेत. तब्बल दोन दशकांनंतरही जव्हार तालुक्यात सर्वाधिक बालके कुपोषणग्रस्त आहेत.

पालघर जिल्ह्यातील १३ प्रकल्पांतील बालके
तलासरी-४५९, जव्हार(१ )-८११, जव्हार (२) -८३८, विक्रमगड - ११६३, मोखाडा ५३५, डहाणू-८२९, कासा -७२६, वाडा- ४०४, पालघर -३९१, मनोर -४९३, वसई(१)- १७६, वसई (२) -४३०

ठाण्यातील १0 प्रकल्पातील बालके
शहापूर- ५६५, डोळखांब -४०४, मुरबाड- ८९, मुरबाड -२१३९, भिवंडी (१)- ५२ भिवंडी (२)-३१६, ठाणे(१)-१७, ठाणे (२)- २३, अंबरनाथ- २३, कल्याण - १२१

Web Title: 9 457 malnutrition in Thane-Palghar districts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.