पालघर लोकसभेसाठी ९ उमेदवारी अर्ज वैध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 04:39 AM2018-05-12T04:39:46+5:302018-05-12T04:39:46+5:30
लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भरण्यात आलेल्या नामनिर्देशनपत्रांची आज (शुक्र वारी) छाननी करण्यात आली. दाखल १४ उमेदवारांपैकी ९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले
पालघर : लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भरण्यात आलेल्या नामनिर्देशनपत्रांची आज (शुक्र वारी) छाननी करण्यात आली. दाखल १४ उमेदवारांपैकी ९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. तर ५ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली.
निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दाखल अर्जांची छाननी केली. त्यामध्ये किरण गहला (भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी), राजेंद्र धेड्या गावित (भारतीय जनता पार्टी), दामोदर बारकू शिंगडा (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), श्रीनिवास चिंतामण वनगा (शिवसेना), बळीराम सुकूर जाधव (बहुजन विकास आघाडी), शंकर भागा बदादे (मार्किस्ट-लेनीस्ट पार्टी आॅफ इंडिया-रेड फ्लॅग), राजेश रघुनाथ पाटील (अपक्ष), वसंत नवशा भसरा (अपक्ष) आणि संदीप रमेश जाधव (अपक्ष) या उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध ठरली.
छाननीमध्ये वनशा सुरजी दुमाडा (भारतीय कम्युनिस्टपक्ष, मार्क्सवादी), पास्कल जान्या धनारे (भारतीय जनता पक्ष), अशोक गोविद शिगंडा (भारिप बहुजन महासंघ), मधुकर पांडुरंग चौधरी (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), प्रभाकर धोंडू उराडे (अपक्ष) या उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे तांत्रिक बाबींच्या पातळीवर अवैध ठरल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी नारनवरे यांनी दिली.