मीरा भाईंदर मध्ये म्युकरमायकोसिसचे ९ रुग्ण ; २ रुग्णांना दिला डिस्चार्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 06:00 PM2021-05-15T18:00:18+5:302021-05-15T18:01:14+5:30
मीरारोड - मीरा भाईंदर म्युकरमायकोसिसचे एकूण ९ रुग्ण असून त्यातील २ रुग्णांना घरी पाठवण्यात आले असून ७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत . सर्वाना कोरोना होऊन गेला होता.
मीरारोड - मीरा भाईंदर म्युकरमायकोसिसचे एकूण ९ रुग्ण असून त्यातील २ रुग्णांना घरी पाठवण्यात आले असून ७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत . सर्वाना कोरोना होऊन गेला होता. ह्या ९ पैकी मीरा भाईंदर मधील ५ तर अन्य शहरातील ४ रुग्ण आहेत .
कोरोनाची लागण झाल्यावर उपचारासाठी जास्त प्रमाणात स्टेरॉइडचा वापर केला गेल्यास रोग प्रतिकारक शक्ती कमी असणाऱ्यां मध्ये म्युकरमायकोसिसचे दुष्परिणाम दिसू लागतात . मीरा भाईंदर मध्ये सध्या २ रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या रुग्णावर उपचार सुरु आहेत . भाईंदरचे रामलोक तर मीरारोडच्या वोक्हार्ट रुग्णालयात म्युकरमायकोसिसचे रुग्ण दाखल आहेत .
महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ . नंदकिशोर लहाने यांनी सांगितले कि , आता पर्यंत म्युकरमायकोसिसचे ९ रुग्ण आढळून आले आहेत . त्यात मीरा भाईंदर मधील तर अन्य शहरातील ४ रुग्ण आहेत . परंतु ह्या पैकी २ जणांना उपचारा नंतर घरी पाठवण्यात आले आहे . बहुतांश म्युकरमायकोसिसचे रुग्ण हे ५० वर्षांच्या वरील आहेत .
कोरोना रुग्णांना उपचार दरम्यान रुग्णाची प्रकृती आणि अन्य आजार यांचा विचार करून स्टेरॉइडचा वापर केला पाहिजे . म्युकरमायकोसिस मुळे घाबरून जाण्याचे कारण नसले तरी नागरिकांनी एलर्जी वा त्रास जाणवत असल्यास तो घरी अंगावर न काढता तातडीने डॉक्टरांना दाखवले पाहिजे असे डॉ . लहाने म्हणाले .