माहीममध्ये ९ जणांना मलेरिया

By admin | Published: August 19, 2015 11:45 PM2015-08-19T23:45:31+5:302015-08-19T23:45:31+5:30

माहीम ग्रामपंचायत क्षेत्रातील नवोदय विद्यालयाजवळील लॅण्डमार्क या रहिवासी संकुलातील इमारतीमध्ये काम करणाऱ्या नऊ कामगारांना

9 people in Mahim, Malaria | माहीममध्ये ९ जणांना मलेरिया

माहीममध्ये ९ जणांना मलेरिया

Next

पालघर : माहीम ग्रामपंचायत क्षेत्रातील नवोदय विद्यालयाजवळील लॅण्डमार्क या रहिवासी संकुलातील इमारतीमध्ये काम करणाऱ्या नऊ कामगारांना मलेरियाची लागण झाल्याने त्यांना मंगळवारी पालघरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.
पालघर तालुक्यात मोठ्या प्रमाणात रहिवासी संकुले उभी राहत असून त्यांचे बांधकाम करण्यासाठी जव्हार, मोखाडा, विक्रमगडसह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या भागांतून मोठ्या प्रमाणात कामगारांचे तांडेच दाखल होत आहेत. इमारती उभारताना बाजूलाच छोटीशी राहुटीवजा झोपडी उभारून ही कुटुंबे अत्यंत गलिच्छ वातावरणात राहत असतात. संबंधित बिल्डरांनी या कामगारांची राहण्याची व सोयीसुविधांची व्यवस्था करणे बंधनकारक असताना त्याकडे काणाडोळा करण्यात येतो.
माहीम ग्रामपंचायत क्षेत्रातील नवोदय विद्यालयाजवळ लॅण्डमार्क हे बंगलो प्रोजेक्ट संकुल उभारण्याचे काम कित्येक वर्षांपासून सुरू असून या प्रोजेक्टवर काम करणारे बिपिन रावत, शिवकुमार रावत, कैलास रावत, वेदनारायण रावत, अनुप रावत, कालू रावत, पप्पू रावत, अरविंद रावत, बीरेन रावत या तरुणांनी खाजगी दवाखान्यात उपचारादरम्यान रक्ततपासणी केली असता त्यात सर्वांना मलेरिया झाल्याचे निष्पन्न झाले. तर, टेंभोंडे येथील एका मोठ्या संकुलाच्या बांधकामादरम्यान मलेरियाची लागण झाल्याने दोघांचा ग्रामीण रुग्णालयात मृत्यू झाला होता. याबाबत उपाय करण्यासंदर्भात ग्रामपंचायत उदासीनता दाखवत आहे. (वार्ताहर)

Web Title: 9 people in Mahim, Malaria

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.