उल्हासनगरात कुत्रीने घेतला ९ ते १० जणांना चावा
By सदानंद नाईक | Published: February 17, 2024 06:59 PM2024-02-17T18:59:26+5:302024-02-17T19:00:01+5:30
कुत्रीला श्वान पथकाने पकडून नेल्याने, नागरिकांनी टाकला सुटकेचा निःश्वास
उल्हासनगर : कॅम्प नं-४, सुभाष टेकडी परिसरात एका कुत्रीने शनिवारी काही तासात ९ ते १० जनाला चावा घेऊन जखमी केले. याबाबतची माहिती समाजसेविका रमाबाई भालेराव यांनी महापालिका श्वान पथकाला दिल्यावर, पथकाने येऊन कुत्रीला पकडून नेले. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-४ येथील सुभाष टेकडी सिद्धार्थ हौसिंग सोसायटी परिसरात एका कुत्रीने चक्क परिसरातील ९ ते १० लोकांना चावा घेत जखमी केल्याची घटना घडली आहे. या घटनेने स्थानिक नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले. भारतीय मानवाधिकार परिषदचे अभिजीत चंदनशिव व समाजसेविका रमाबाई भालेराव यांनी उल्हासनगर महापालिका श्वान पथकाला याबाबत माहिती दिल्यावर, पथकाने शनिवारी दुपारी सापळा रचून कुत्रीला पकडून नेले. कुत्रीला पकडल्याने स्थानिक नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र कुत्रीला पकडून नेल्यावर, तीच्या लहान पिल्लाचे काय होणार? असा प्रश्नही पडला आहे. प्राणी मित्रांनी कुत्रीच्या पिल्लाची देखभाल करण्याची मागणी होत आहे.