एसटीच्या धडकेत ९ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू
By admin | Published: October 21, 2015 03:07 AM2015-10-21T03:07:10+5:302015-10-21T03:07:10+5:30
रस्ता ओलांडणाऱ्या आजी-नातवाला महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेच्या बसने (एसटी) जोरदार धडक दिली. यामध्ये नऊ वर्षीय दुर्वेशचा जागीच मृत्यू झाला तर अनिता गिरी गंभीर जखमी
ठाणे : रस्ता ओलांडणाऱ्या आजी-नातवाला महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेच्या बसने (एसटी) जोरदार धडक दिली. यामध्ये नऊ वर्षीय दुर्वेशचा जागीच मृत्यू झाला तर अनिता गिरी गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ठाण्यातील आझादनगर गल्लीसमोर घडली. याप्रकरणी एसटी चालकाला पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ठाण्यातील कॉसल मिल परिसरात अनिता गिरी (६५) क्लास सुटल्यावर मंगळवारी सकाळी दुर्वेशला घरी नेण्यासाठी गेल्या होत्या. आझादनगर गल्लीसमोर रस्ता ओलांडत असताना शहापूर डेपोची वाड्यावरून ठाण्याकडे जाणाऱ्या एमएच ०७ सी ७१८३ क्रमांकाची एसटी बसने त्यांना जोरदार धडक दिली. जोरदार धडकेने दुर्वेशच्या डोक्याला मोठी दुखापत होवून त्याचा जागीच मूत्यू झाला. तर आजीचे हात-पाय फे्रक्चर झाले. यावेळी कॉसल मिल चौकात १०० ते १५० जणांचा जमाव जमला होता. त्यामुळे काही काळ वाहतूककोंडी झाली. मात्र, वाहतूक आणि राबोडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला. बस चालक ज्ञानेश्वर संघशेट्टीला अटक करण्यात आली. दुर्वेश हा गिरी कुटूंबातील लहान मुलगा होता. तो श्रीरंग विद्यालयात तिसरीत होता. याप्रकरणी राबोडी पोलीस पुढील तपास करत आहेत. (प्रतिनिधी)