बारवीत ९० टक्के पाणीसाठा झाला जमा; जिल्ह्यात पावसाची विश्रांती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 01:02 AM2020-08-25T01:02:41+5:302020-08-25T01:02:51+5:30
भातसा, वैतरणात ९५ टक्के पाणीसाठा
ठाणे : रविवारी चांगाला बरसल्यावर जिल्ह्यात सोमवारी पावसाने काहीअंशी विश्रांती घेतली. गेल्या २४ तासात जिल्हाभरात अवघा २० मिमी पाऊस पडल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली. तर पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणात आतापर्यंत ९०.२० टक्के पाणीसाठा असून ते भरण्यासाठी अवघी एक मीटर पाणीपातळी बाकी असल्याची नोंद एमआयडीसीने घेतली आहे.
पावसाने विश्रांती घेतल्यामुळे सोमवारी शहरातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी ग्राहक दिसून आले. गेल्या २४ तासांत ठाण्याला २०.९ मिमी, कल्याणला १९.५मिमी, मुरबाडला १४, भिवंडीला २४, शहापूरला १५, उल्हासनगरला २० आणि अंबरनाथला २३ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
बारवी धरणात मुबलक पाणीसाठा तयार झाल्यामुळे आता तूर्त तरी ठाणेकरांची पाणीसमस्या मिटली आहे. याप्रमाणेच कल्याण -डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा भार्इंदर आणि ठाणेच्या काही भागासह ग्रामीण क्षेत्राला पाणीपुरवठा करणाºया उल्हास नदीवरील आंध्रा धरणात १३ मिमी पाऊस पडला असून त्यातही ६१ टक्के पाणीसाठा आहे. मुंबई, ठाण्याला पाणीपुरवठा करणाºया भातसा धरणात २४ मिमी पाऊस पडला.
आतापर्यंत या धरणात ९५ टक्के पाणीसाठा तयार झाला आहे. मोडकसागर धरण १०० टक्के भरलेले आहे. तर तानसा धरणात ४५ मिमी. पाऊस पडलेला असून आतापर्यंत ९९ टक्के पाणीसाठा या धरणात झाला आहे. मध्य वैतरणात ९५ टक्के पाणीसाठा असून या धरणात ५१ मिमी पाऊस पडला.